धक्कादायक! पत्नी पळून गेल्याने 2 चिमुकल्यांना गळफास लावून शिक्षकाने केली आत्महत्या

धक्कादायक! पत्नी पळून गेल्याने 2 चिमुकल्यांना गळफास लावून शिक्षकाने केली आत्महत्या

सगळ्यात धक्कादायक म्हणजे रुषीकांत याने आधी आपल्या मुलांना गळफास दिला. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

  • Share this:

महेश तिवारी, प्रतिनिधी

चंद्रपूर, 02 एप्रिल : चंद्रपूरमध्ये प्रेमाला काळीमा फासणारा एक प्रकार घडला आहे. पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून पतीने स्वतः आत्महत्या केली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बल्लारपुर इथे राहणारे रुषीकांत कदुपल्ली हे पेशाने शिक्षक आहेत. त्यांची पत्नी आणि 2 मुलं असं त्यांचं कुटुंब आहे. रुषीकांत यांच्या पत्नीचे एक वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण होतं. गेल्या आठ दिवसांआधी रुषीकांत यांच्या पत्नी वाहनचालकासोबत पळून गेली. त्यामुळे रुषीकांत एकटे पडेल. त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला.

या घटनेने व्यथीत झालेल्या रुषीकांतने दोन्ही मुलींना गळफास लावत स्वत:हा आत्महत्या केली. सगळ्यात धक्कादायक म्हणजे रुषीकांत याने आधी आपल्या मुलांना गळफास दिला. त्यानंतर त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

पत्नीला फोटो मिळताच तिने हा प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घरातून तीन मृतदेह ताब्यात घेतले आहेत. तर याबद्दल आता पोलीस कसून तपास करत आहेत.

पोलिसांनी घरातून मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. रुषीकांत यांच्या या कृत्यामुळे परिसरात एकच खळबल उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आता रुषीकांत यांच्या पत्नीची चौकशी होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

VIDEO : पार्थ पवार पुन्हा वादात, दैवी शक्तीचा दावा करणाऱ्या 'फादर'ची घेतली भेट

Tags:
First Published: Apr 2, 2019 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading