बीड, 01 नोव्हेंबर : तीन महिन्यांच्या गर्भवतीने (pregnant wife) ऊसतोडणीला जाण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला बेदम मारहाण केली. यावेळी पतीने पोटात लाथा मारल्याने विवाहितेच्या पोटातील तीन महिन्यांचे अर्भक दगावल्याची संतापजनक घटना बीडमध्ये (beed) घडली आहे. या प्रकरणी पती आणि सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील कुरणवाडी तांडा येथे घडली. कविता बालाजी पवार ( वय 21) असं पीडित विवाहितेचे नाव आहे. एक वर्षापूर्वी तिचे लग्न बालाजी नामदेव पवार याच्यासोबत झाले. पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी दोघांमध्ये वाद सुरू झाला.
पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुण्यासह या जिल्ह्यांना इशारा
कविताच्या फिर्यादीनुसार,18 ऑक्टोबर रोजी तिला पती बालाजी आणि सासू सुमन यांनी ऊसतोडणीला सोबत चल म्हणून आग्रह धरला. परंतु, तीन महिन्यांची गर्भवती असल्या कारणाने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याने कविताने ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला.
त्यामुळे संतापलेल्या पतीने आणि सासूने तिला मारहाण सुरू केली. यावेळी पतीने पोटात लाथ मारल्याने तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कविता एकटीच स्वाराती रुग्णालयात दाखल झाली. तपासणीअंती तिच्या पोटातील तीन महिन्यांच्या अर्भकाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्याने ते मृत बाळ काढून टाकण्यात आले असे फिर्यादीत नमूद आहे.
भारताच्या पराभवानंतर वसीम-वकारने मर्यादा ओलांडली, संतापजनक VIDEO
पीडित कविताच्या फिर्यादीवरून तिचा पती आणि सासूवर कलम ३१६,३२३,३४ अन्वये अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.