Home /News /maharashtra /

नात्याला काळिमा! मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा, हिंगोलीतील घटना

नात्याला काळिमा! मित्र बायकोवर करत होता बलात्कार अन् पती देत राहिला पहारा, हिंगोलीतील घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Rape in Hingoli: हिंगोली जिल्ह्यातील सवड याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार करायला लावला (husband forced friend to rape his wife) आहे.

    हिंगोली, 22 जानेवारी: हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातील सवड याठिकाणी नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणाने आपल्या पत्नीवर मित्राला बलात्कार (husband forced friend to rape his wife) करायला लावला आहे. पीडित महिला घरी एकटी असल्याचं पाहून आरोपी पती मित्राला घरी घेऊन आला होता. यावेळी त्याने आपल्या मित्राला घरात पाठवून पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. या प्रकरणी पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना हिंगोली जिल्ह्यातील सवड या गावातील आहे. घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला घरी एकटीच होती. यावेळी आरोपी पती आपला मित्र माधव जोगदंड याला घरी घेऊन आला होता. यावेळी आरोपी पती घराबाहेर थांबून मित्राला घरात पाठवून स्वत:च्या पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. यावेळी विकृत पती घराबाहेर उभा राहून पहारा देत होता. हेही वाचा-पुण्यात विधवा महिलेवर 8 जणांकडून बलात्कार, नराधमांनी केलेलं कृत्य वाचून हादराल नराधम मित्राने देखील मैत्रीला काळिमा फासत मित्राच्या पत्नीला आणि तिच्या मुलीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केला आहे. या धक्कादायक घडल्यानंतर पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-सोलापूर: बहिणीची बदनामी नाही झाली सहन; मेहुण्याने भाऊजीला दिली भयंकर शिक्षा आरोपी पतीने यापूर्वी देखील चारित्र्यावर संशय घेत अनेकदा मानसिक त्रास दिल्याचा आरोप पीडितेनं आपल्या तक्रारीत केला आहे. यानंतर त्याने हद्दच पार करत मित्राकडून पत्नीवर बलात्कार घडवून आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही. या घटनेचा सविस्तर तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Rape

    पुढील बातम्या