भाजीत मीठ जास्त घातले म्हणून पतीनं कापले पत्नीचे केस!

भाजीत मीठ जास्त घातले म्हणून पतीनं कापले पत्नीचे केस!

भाजीत मीठ जास्त का घातले म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कात्रीने कापून टाकल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडलीय.

  • Share this:

सोलापूर,ता.15 एप्रिल: भाजीत मीठ जास्त का घातले म्हणून संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कात्रीने कापून टाकल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील नान्नज येथे घडलीय. याप्रकरणी पीडीत रुकसाना हिने पती आसिफ शेख याच्याविरूद्ध दिलेल्या तक्रारीची सोलापूर तालुका पोलिसांनी दखल घेतली आहे.

बुधवारी सकाळी रुकसाना हिने पालकची भाजी केली. जेवत असताना अफसानाचा पती असिफ याला भाजीत मीठ जास्त असल्याचे जाणवले. यावरून तो संतापला आणि त्याने रुकसाना हिला लाथाबुक्क्याने मारहाण केली. इतक्यावरच तो थांबला नाही तर घरातील कात्री घेऊन नरड्यावर पाय ठेवून त्याने तिचे लांबसडक केस कापून टाकले.

त्यानंतर रुकसाना सोलापूरला आपल्या बहिणीकडे आली आणि दरम्यान तिला न्याय मिळवून देण्यासाठी यशदा फौंडेशनच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर तीनं सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर तिची कैफीयत मांडली.

ग्रामीण पोलिसांनी याची दखल घेत पतीविरूद्ध तक्रार नोंदवून घेतलीय. पती असीफ हा काहीच कामधंदा करीत नाही. पत्नी कामाला जाऊन घर चालविते. ती कामाला गेली नाही की तो त्रास देत असल्याचे रुकसानाच्या आई वडिलांचे म्हणणे आहे.

 

First published: April 15, 2018, 8:00 PM IST

ताज्या बातम्या