Home /News /maharashtra /

धक्कादायक! पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, मोबाइलवर VIDEO शूट करुन उचललं टोकाचं पाऊल

धक्कादायक! पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या, मोबाइलवर VIDEO शूट करुन उचललं टोकाचं पाऊल

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Pandharpur News: मोबाइलवर व्हिडीओ शूट करत या व्यक्तीने टोकाचं पाऊल उचललं आहे. पंढरपुरातील या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मृतकाची पत्नी, सासू आणि सासऱ्यासह एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पंढरपूर, 29 मार्च : पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून एका व्यक्तीने आत्महत्या (Suicide due to harassment of wife) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपुरात (Pandharpur) ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने आपल्या मोबाइलमध्ये एक व्हिडीओ शूट (video shoot before commits suicide) केला होता. या व्हिडीओत त्याने पत्नी आणि सासरच्यांवर आरोप केल्याची माहिती समोर आली आहे. मोबाइलवर व्हिडीओ तयार करून तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी (27 मार्च) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जळोली येथे घडली. उमेश विलास काळे (रा. जळोली) असे मयत तरुणाचे नांव आहे. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी करकंब पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. याप्रकरणी पत्नी, सासू, सासऱ्यासह एकूण 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वाचा : पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून 24 वर्षीय जवानाची आत्महत्या, पुण्यातील धक्कादायक घटना मयत उमेश हा पत्नी प्राची आणि लहान मुलगी यांच्यासमवेत जळोली येथे राहत होता. पत्नी प्राची ही लग्न झाल्यापासून पती उमेश याच्यावर संशय घेऊन शारीरिक, मानसिक छळ करीत होती. तसेच माहेरी राहायला येण्याचा हट्ट करीत होती. 23 मार्च रोजी प्राची हिने उमेशला जबरदस्तीने बादलेवाडी येथे नेले. त्यानंतर 25 मार्च रोजी पत्नी प्राची, सासू मनिषा, सासरा ज्ञानेश्वर हनुमंत काळे यांनी उमेश यास बादलेवाडीच्या माळरानावर नेऊन मारहाण केली. त्यानंतर तेथून पळून येऊन उमेश हा जळोली येथे एकटाच राहत होता. पत्नी, सासू, सासरा, पत्नीचा चुलता, चुलती आदींनी मारहाण केल्याने तसेच पत्नीचे दुसऱ्या एका तरूणाबरोबर अनैतिक संबंध असल्याने खूप मानसिक तणावात होता. मानसिक त्रास सहन करावा लागत असून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, असे उमेश याने आपल्या वडिलांना सांगितले होते. अखेर रविवारी सकाळी उमेश याने पत्राशेडच्या अँगलला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतेवेळी त्याने मोबाइलमध्ये व्हिडीओ तयार केला असून आत्महत्येस पत्नीसह इतर लोक जबाबदार असल्याचे त्याने नमूद केले आहे, असे पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Crime, Pandharpur, Suicide

पुढील बातम्या