Home /News /maharashtra /

नागपूर हादरलं, 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या!

नागपूर हादरलं, 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या!

मदन अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले होते. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा...

नागपूर, 18 जानेवारी : आर्थिक अडचणीतून पतीने आपल्या दोन लहान मुलांची आणि पत्नीची (wife murder) निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये (nagpur) घडली आहे. पत्नी आणि मुलांचा हत्या केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नागपूरमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  नागपूरच्या जरीपटका भागात ही घटना घडली आहे. मदन अग्रवाल (madan agarwal) असं हत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मदन अग्रवाल हा आपल्या दोन लहान मुलं आणि पत्नीसह जरीपटका भागात राहत होता. सोमवारी रात्री जेवणं करून सर्वजण झोपी गेले होते. त्यानंतर झोपेत असताना पत्नीचा गळा चिरला. त्यानंतर आपल्या दोन लहान मुलांच्या गळ्यावरही चाकू फिरवून त्यांचाही खून केला. पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर मदन अग्रवाल याने स्वत: विष प्राशन करून आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी घरातून कुणीही बाहेर आलं नाही. आज दिवसभर घराच्या बाहेर कोणी न आल्याने शेजाऱ्यांनी चौकशी केली असता चौघांचे मृतदेह आढळून आले. शेजाऱ्यांनी तातडीने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घराचा दार तोडून आतमध्ये प्रवेश केला. तेव्हा मदन अग्रवाल यांची पत्नी मुलगा-मुलगी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. तर मदन अग्रवाल यांचा मृतदेह सिलिंग अडकून होता. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. मदन अग्रवाल हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडले होते.  यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणाचा अधिक तपास जरीपटका पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रेयसीने केला प्रियकरावर चाकूने हल्ला तर दुसरीकडे, नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दत्तवाडी इथं एका प्रेयसीने प्रियकरावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. अक्षय ढोके असं जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकूचा वार गंभीर असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुजा गोस्वामी असं आरोपी प्रेयसीचे नाव आहे. अक्षय आणि आरोपी पुजा गोस्वामी यांच्यामध्ये मागील दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. पुजाने अक्षयला वारंवार लग्न करण्यासाठी विचारणा केली होती. पण, तो प्रत्येक वेळी टाळाटाळ करत होता. आज पुन्हा एकदा पुजाने अक्षयला लग्नाबद्दल विचारणा केली, त्यावेळी त्याने पुन्हा टाळालं. त्यावेळी दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. त्यामुळे रागाच्या भरात पूजाने स्वयंपाक घरातील चाकूने प्रियकर अक्षय ढोकेवर चाकूने हल्ला केला. अक्षयवर चाकूने सपासप वार केले. त्यामुळे अक्षय रक्ताच्या थारोळ्यात जागेवरच कोसळला. हा प्रकार शेजारच्यांनी तातडीने अक्षयला रुग्णालयात दाखल केलं. घटनेत प्रियकर अक्षय ढोके गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. पोलिसांनी प्रेयसी पूजाला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.

तुमच्या शहरातून (नागपूर)

Published by:sachin Salve
First published:

Tags: Murder

पुढील बातम्या