दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीची आत्महत्या

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबई हादरली, पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीची आत्महत्या

दिवाळीच्या तोंडावर नवी मुंबईत धक्कादायक घटना

  • Share this:

नवी मुंबई, 12 नोव्हेंबर: तळोजा (Taloja) येथे पत्नीवर प्राणघातक हल्ला (Assaulting his wife) करून पतीनं आत्महत्या (husband commits suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

पतीनं पत्नीला चाकू भोसकून प्राणघातक हल्ला करून स्वत: रेल्वेखाली आत्महत्या केली. तळोजामधील नावडे येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी नवी मुंबई पोलीस पुढीस तपास करत आहेत. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

हेही वाचा.. SHOCKING! नोकरी करते म्हणून चाकूनं काढले डोळे, झाडली गोळी; पोलिसावर क्रूर हल्ला

मिळालेली माहिती अशी की, गणेश दुर्गंडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. तर त्याची पत्नी अर्चना दुर्गंडे गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीनं कळंबोली येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहे. अर्चनाची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

ऐन दिवाळीच्या तोंडावर ही धक्कादायक घटना घडल्यानं नावडेसह नवी मुंबई परिसर हादरला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, यापूर्वी अशीच गेल्या काही दिवसांपूर्वी विरारमध्ये घडली होती. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीवर प्राणघातक हल्ला करून पतीनं आत्महत्या केली होती. करसन पुरजा वसरा असं मृत पतीचं नाव होतं तर मंजू करसन वसरा असं जखमी पत्नीचं नाव आहे.

हेही वाचा..किळसवाणे: दफन केलेल्या मृतदेहाचे केस काढून विकणाऱ्यांना अटक

विरार पूर्व भागात साईबाबा मंदिराजवळ ही घटना घडली होती. मंजूचा पती करसन हा तिच्या चारित्र्यावर कायम संशय घेत होता. याच संशयातून त्यानं धारदार चाकूनं मंजूच्या तोंडावर, हातावर सपासप वार करून तिच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. नंतर करसन यानं बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती.

दुसरीकडे, पुण्यात पत्नीचा खून करून पतीने फाशी घेऊन आत्महत्या केली. सणसवाडी (ता. शिरूर) येथे गेल्या आठवड्यात ही घटना घडली होती. त्यांच्या 9 वर्षांच्या मुलीने या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

Published by: Sandip Parolekar
First published: November 12, 2020, 12:30 PM IST

ताज्या बातम्या