• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • प्रसूतीदरम्यान आईच्या मृत्यूनंतर पित्याचा भयावह शेवट; नवजात बालकाच्या नशिबी आलं अनाथाचं जगणं

प्रसूतीदरम्यान आईच्या मृत्यूनंतर पित्याचा भयावह शेवट; नवजात बालकाच्या नशिबी आलं अनाथाचं जगणं

पालघरमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी प्रसूतीदरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर (Wife died while giving birth) एका तरुणानं आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट (Husband commits suicide) केला आहे.

 • Share this:
  पालघर, 19 नोव्हेंबर: पालघर (Palghar) जिल्ह्यातील जव्हार (Jawhar) तालुक्यात एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. याठिकाणी प्रसूतीदरम्यान पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर (Wife died while giving birth) एका तरुणानं आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट (Husband commits suicide) केला आहे. आई आणि वडिलांच्या अकाली मृत्यूमुळे नवजात चिमुकल्यावर अनाथाचं जगणं जगण्याची वेळ आली आहे. संबंधित बाळाचा सध्या वयोवृद्ध आजीकडून सांभाळ केला जात आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुष्पा शैलेश पारधी (वय-18) असं प्रसूतीदरम्यान मृत पावलेल्या महिलेचं नाव असून त्या जव्हार तालुक्यातील ओझर कुंडाचापाडा येथील रहिवासी आहेत. मृत पुष्पा यांना गेल्या महिन्यात जव्हार येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. याठिकाणी त्यांनी बाळाला जन्म दिल्यानंतर, अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे पुष्पा यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण याठिकाणी त्यांच्यावर योग्य ते उपचार झाले नाहीत. त्यामुळे त्यांची प्रकृती अजून ढासळली. हेही वाचा-आर्यन खान प्रकरणानंतर आणखी एका प्रकरणाने समीर वानखेडेंचं टेन्शन वाढणार? त्यामुळे नातेवाईकांनी त्यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. येथील डॉक्टरांनी पुष्पा यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारादरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूनंतर नवजात बाळाचा सांभाळ कसा करायचा? या विवंचनेतून पुष्पा यांचा पती शैलेश पारधी मानसिकरित्या पूर्णपणे खचला होता. तसेच शैलेश यांच्या वडिलांना गेल्या तीन वर्षांपासून क्षय रोगानं ग्रासलं होतं. अशात नवजात बाळाचा सांभाळ कसा करायचा? हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. हेही वाचा-'आता माझ्याकडे बंदूक असती तर...' धमकी देत NCP आमदाराच्या कानशिलात लगावल्या त्यामुळे शैलेश यांनी आपल्या घराच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आई आणि वडिलांचा अशाप्रकारे शेवट झाल्याने नवजात बाळं एकटं पडलं आहे. संबंधित बाळाची वयोवृद्ध आजी सध्या त्याचा सांभाळ करत असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: