अमरावती, 23 जानेवारी : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमरावतीमध्ये नुकतीच घडली. पत्नी मैत्रिणीच्या लग्नात जाण्याचा बहाना करून घराबाहेर जाते. आता पत्नी घरी नसल्याचं साधून पतीने कॉलगर्लला फोन केला. पण जेव्हा तिला भेटायला गेला तेव्हा ती पत्नीच निघाली. त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नीची रस्त्यावर धुलाई केली अन् पत्नीनेही पतीला शिवीगाळ करून पळ काढला.
घडलेली हकीकत अशी की, अमरावती येथील उच्चभ्रू वस्तीत राहणारे 38 वर्षीय पुरुष आणि 34 वर्षीय महिलेचा गुण्यागोविंदाने संसार सुरू होता. मात्र, बुधवारी 22 जानेवारी त्यासाठी धक्कादायक आणि संसाराच्या जीवनाला कलाटणी देणारा दिवस ठरला.
बुधवारच्या दिवशी पत्नीने मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत परत येईल असं सांगून घराबाहेर निघाली. पत्नी घराबाहेर जाताच पतीने आपल्या मित्राला कॉल करून कालगर्लचा नंबर मागितला. पतीने कॉलगर्लला आपल्या नियमित मोबाईलवरून कॉल केला. कॉल गर्लने तो कॉल स्वीकारून केव्हा आणि कुठे भेटायचं ठरलं. त्यानंतर थोड्याच वेळात कॉलगर्लचा फोन आला निश्चित कुठे यावं याबाबत विचारणा करत होती. तिला पत्ता माहित नसावा असे समजून पतीने शहरातील राठीनगर येथील एका ठिकाणी भेटण्यासाठी बोलावलं.
वर्दळीच्या ठिकाणी दोघेही पोहोचले एकमेकांचा शोध सुरू झाला स्कार्फ बांधून उभी असलेली महिला फोनवर बोलताना पाहून पतीदेव तिच्याजवळ पोहोचला आणि काय आश्चर्य कॉलगर्ल म्हणून आलेली ती महिलाच चक्क त्याची पत्नी निघाली.
आता पत्नीचे बिंग फुटताच दोघांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. आपली पत्नीच कॉलगर्ल निघाल्यामुळे पतीचा पाचर धाऱ्यावर बसली. तर आपला पती आपल्या माघारी असे कृत्य करतो हे कळल्यावर पत्नीचा पारा चांगलाच चढला. त्यानंतर दोघांमध्ये रस्त्यावरच कडाक्याचे भांडण सुरू झाले. एवढंच नव्हे तर संतापलेल्या पतीने भररस्त्यावर पत्नीला चांगलेच बदडले तर पत्नीनेही पतीला मारहाण केली. बघता बघता बघ्यांची चांगलीच गर्दी झाली. आधी पती-पत्नीचे भांडण म्हणून कुणीही त्यांच्यामध्ये पडायला तयार नव्हते. पण त्यांच्या भांडणातूनच असा प्रकार असल्याचं समोर आलं. अखेर पत्नीने काढता पाय घेत तिथून निघून गेली. त्यानंतर पती ही निघून गेली.
फोन नंबरही निघाले वेगळे!
कॉल गर्ल म्हणून ज्या महिलेला फोन लावला तो नंबर वेगळा होता. तर नवीन मोबाईलमध्ये पतीचा नंबर सेव्ह नव्हता. त्यामुळे शेवटपर्यंत दोघांनीही एकमेकांना ओळखलं नाही. मात्र, या प्रकरणामुळे सामाजिक जीवन किती रसातळाला पोहोचलं याची कल्पना येते. पाऊल वाट चुकल्यामुळे दोघांनी याबद्दल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.