Home /News /maharashtra /

रात्रीतून पत्नी पळून जाईल, म्हणून पतीने जे केले ते पाहून पोलीसही झाले हैराण

रात्रीतून पत्नी पळून जाईल, म्हणून पतीने जे केले ते पाहून पोलीसही झाले हैराण

पतीने इतक्या निर्दयीपणे पत्नीवर कोयत्याने वार केला की, शेजारी झोपलेल्या मुलीलाही त्यामुळे गंभीर दुखापत झाली.

    नाशिक, 14 जून : संशयाचं भूत डोक्यात शिरलं तर माणूस कोणत्या थराला पोहोचले याचा नेम नाही. चारित्र्याच्या संशयातून पतीने गाढ झोपेत असलेल्या पतीच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये घडली. या घटनेत सहा महिन्याची चिमुरडीही जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहे. शनिवारी (ता. १३) मध्यरात्री झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर कोयत्याने वार करुन संशयित पतीने तिचा खून केल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आईच्या कुशीत झोपलेली सहा वर्षांची चिमुरडीही जखमी झाली असून तिच्यावर बिटको रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दैनिक सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, नाशिक जिल्ह्यातील जाखोरी इथं शनिवारी 14 जून रोजी ही घटना घडली आहे. या परिसरात राहणाऱ्या ज्योती उर्फ मिना शिवाजी माळी (वय 27) आणि शिवाजी माळी (वय 30) यांचा सुखी संसार सुरू होता. या दाम्पत्यांना सहा महिन्याची मुलगी आहे. हेही वाचा-कुख्यात प्रीतीचा खेळ अखेर खल्लास, कृत्य ऐकून तुम्ही व्हाल हैराण पण, गेल्या दिवसांपासून दोघांमध्ये खटके उडायला लागले. त्यामुळे दोघांमध्ये प्रचंड वाद होत होता. शिवाजी माळीला आपल्या पत्नीवर संशय निर्माण झाला होता.  पत्नी ज्योती ही रात्री घरातून पळून जाईल असा संशय शिवाजीला होता. त्यानंतर शनिवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास जेवण करून सर्वजण झोपी गेले होते. पत्नी आणि मुलगी झोपेत असताना शिवाजीने कोयता हातात घेतला आणि पत्नीवर सपासप वार केले. पत्नीच्या गळ्यावर आणि डोक्यात त्याने कोयत्याने वार केले. यात तीचा जागीच मृत्यू झाला. पतीने इतक्या निर्दयीपणे पत्नीवर कोयत्याने वार केला की, शेजारी झोपलेल्या मुलीलाही त्यामुळे दुखापत झाली, याचे सुद्धा त्याला भान नव्हते.  यात सहा वर्षांची चिमुरडी ही गंभीर जखमी झाली. हेही वाचा-गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी क्वारंटाइन सेंटरमधून पळाले, 2 तरुणांसोबत काय झालं वाचा या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी मुलीला तातडीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपी शिवाजी माळीला अटक केली असून त्याने खुनाची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. संपादन - सचिन साळवे
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Nashik, नाशिक, पती, पत्नी, संशय

    पुढील बातम्या