मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /नवराच ठरला प्रेमाला अडथळा, बायकोने प्रियकराच्या मदतीने केला खून

नवराच ठरला प्रेमाला अडथळा, बायकोने प्रियकराच्या मदतीने केला खून

 आरोपी जितेंद्र भंडारी याने राजूला दारु पिण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. त्यानंतर दारूच्या नशेत तर्र झालेल्या राजूवर लोखंडी रॉडने हल्ला केला.

आरोपी जितेंद्र भंडारी याने राजूला दारु पिण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. त्यानंतर दारूच्या नशेत तर्र झालेल्या राजूवर लोखंडी रॉडने हल्ला केला.

आरोपी जितेंद्र भंडारी याने राजूला दारु पिण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. त्यानंतर दारूच्या नशेत तर्र झालेल्या राजूवर लोखंडी रॉडने हल्ला केला.

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 16 ऑक्टोबर : चंद्रपूरमधील  (chandrapur) पडोली भागात एका 45 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. पोलिसांनी वेगवान तपास करून अवघ्या 3 तासांत खूनाचा (murder case) छडा लावला आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचं तपासातून समोर आलं असून या प्रकरणी एकाला अटक (arrest) करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज  चंद्रपूर शहरालगत पडोली भागात 45 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता मृत व्यक्तीचे नाव राजू अनंत मलिक असल्याचं समोर आलं. राजू मलिक याचा मृतदेह हा पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिनर्जी वर्ल्ड परिसरातील मोकळ्या शिवारात आढळून आला होता.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा तपास करत असताना त्यांच्या पत्नीची चौकशी केली. पण, तिच्या चौकशीतून पोलिसांनी संशय आला. त्यानंतर पोलिसांनी परिसरात इतर लोकांकडे चौकशी केली आणि धक्कादायक माहिती समोर आली.

राम राम म्हणत रंगमंचावरच कलाकाराचा मृत्यू; रामलीलेदरम्यान 'दशरथा'ने सोडला जीव

मयत राजू मलिकच्या पत्नीचे आरोपी जितेंद्र भंडारी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. राजू मलिकला आपल्या पत्नीवर याबद्दल संशय येत होता. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे प्रेमाला अडथळा येत असल्यामुळे राजूच्या पत्नीने प्रियकर जितेंद्र भंडारीच्या मदतीने काटा काढण्याचा प्लॅन केला.

आरोपी जितेंद्र भंडारी याने राजूला दारु पिण्याच्या बहाण्याने सोबत घेऊन गेला. त्यानंतर दारूच्या नशेत तर्र झालेल्या राजूवर लोखंडी रॉडने हल्ला केला. डोक्यात लोखंडी रॉडने सपासप वार करून जितेंद्र याने राजूचा खून केला. त्यानंतर सिनर्जी वर्ल्ड परिसरातील मोकळ्या शिवारात राजूचा मृतदेह फेकून पळ काढला.

IPL 2022 होणार आणखी रोमांचक, फक्त 10 टीमच नाही तर... सौरव गांगुलीने दिली Update

जितेंद्रचे मयत राजूच्या पत्नीशी पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमातला अडसर दूर करण्यासाठी राजूची हत्या करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्याजवळून रॉड व अन्य पुरावे जप्त केले आहेत. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केवळ तीन तासात खुनाच्या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

First published:

Tags: चंद्रपूर