तुला नांदायचं नाही का? असं म्हणत झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीनं केले सपासप वार

तुला नांदायचं नाही का? असं म्हणत झोपलेल्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीनं केले सपासप वार

पतीनं चक्क सासरी जाऊन पत्नीच्या चेहऱ्यावर कत्तीनं सपासप वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

बीड, 26 डिसेंबर: पतीनं चक्क सासरी जाऊन पत्नीच्या चेहऱ्यावर कत्तीनं सपासप वार (Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्याचं समजतं.

आष्टी तालुक्यातील देवळाली पानाची येथे ही उघडकीस आली असून जया सुरेश पवार असं जखमी महिलेचं नाव आहे. जया यांच्या फिर्यादीवरून आरोपी सुरेश पवार याच्याविरुद्ध अंभोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा...इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच प्राध्यापकाकडून जीव देण्याचा प्रयत्न, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर टाकला VIDEO

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जयाचा पती सुरेश अंकुश पवार याला दारूचं व्यसन आहे. तो कायम दारुच्या नशेत असतो. दारुडा पती सुरेश पवार हा पत्नीला कायम मारहाण करत होता याच जाचाला कंटाळून जया गेल्या दीड महिन्यापासून माहेरी अर्थात देवळाली पानाची येथे राहायला आली होती.

मंगळवारी (22) रात्री जया मुलांसह घरासमोरील ओट्यावर झोपली असतानाच रात्री 10 वाजताच्या सुमारास सुरेश मद्यधुंद अवस्थेत आला. जयाला झोपेतून उठवत 'तुला नांदायचे नाही का? असा जाब विचारात त्यानं तिच्या चेहऱ्यावर कत्तीनं सपासप वार करून गंभीर जखमी केलं. जयाची आरडाओरड ऐकून तिची मुलं आणि बहीण उठली. आईला मारू नका, असं मुलं गयावया करत असतानाही सुरेशने लाथाबुक्क्यांनी जयाला बेदम मारहाण करत शिवीगाळ केली. एवढंच नाही तर तिला जीवे मारण्याच्या धमक्या देत निघून गेला.

हेही वाचा...आधी चार वेळा चौकशी झाली, ही पाचवी; आणखी काय म्हणाले एकनाथ खडसे

जयाला जखमी अवस्थेतील तिच्या भावानं आष्टीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. तिच्यावर उपचार सुरू आहेत. जयाच्या फिर्यादीवरून सुरेश पवार याच्यावर अंभोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप दारुड्या पतीला अटक केली नाही.

Published by: Sandip Parolekar
First published: December 26, 2020, 8:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या