नवऱ्याने कोरोना टेस्ट करायला सांगताच बायकोचा चढला पारा, नंतर झालं असं..

नवऱ्याने कोरोना टेस्ट करायला सांगताच बायकोचा चढला पारा, नंतर झालं असं..

एका दाम्पत्यामध्ये चक्क फ्री स्टाईल हाणामारी झाली. हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर दाम्पत्यामध्ये झालेल्या हाणामारीमागील कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

  • Share this:

औरंगाबाद, 11 एप्रिल: कोरोना विषाणूच्या संक्रमानामुळे देशातीलच नाही तर जगातील लोकांच्या जीवनशैली बदलली आहे. औरंगाबाद शहरात तर कोरोनामुळे कौटुंबिक हिंसाचार झाल्याचे समोर आलं आहे. एका दाम्पत्यामध्ये चक्क फ्री स्टाईल हाणामारी झाली. हे प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर दाम्पत्यामध्ये झालेल्या हाणामारीमागील कारण ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

हेही वाचा..नाशिक: उच्च अधिकाऱ्याची आत्महत्या, पोलिस स्टेशनमध्येच झाडली गोळी

नेमकं प्रकरण काय?

शहरातील मुकुंदवाडी परिसरात ही घटना घडली आहे. लॉकडाऊन जाहीर होण्याआधी महिला तिच्या माहेरी मुंबईला गेली होती. लॉकडाऊन झाल्यानंतर महिला कशीबशी सासरी औरंगाबादला आली. मात्र, मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्या महिलेचा पती तिच्या संशयानं पाहत होता. एवढंच नाही तर कोरोनाच्या धास्तीनं ते पत्नीजवळही जात नव्हता. नवरा आपल्या चरित्र्यावर संशय घेतो आहे. त्यामुळेच तो अंतर ठेवून आपल्याशी वागत आहे, असं महिलेला वाटलं.

अखेर याबाबत महिलेने पतीकडे जाब विचारला असता त्याने तिला कोरोना टेस्ट करून घ्यायला सांगितलं. त्यावर पत्नीने टेस्ट करून घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि उलट माझ्या चारित्र्यावर संशय घेतोस का? म्हणून पतीशीच हुज्जत घालायला लागली.

हेही वाचा..महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन कायम, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

कोरोना चाचणी करून घेण्याचा कारणावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. वाद विकोपाला गेला. संतापलेल्या पतीनं हातात दांडूकं घेऊन पत्नीला बदडण्यास सुरुवात केली. पत्नीनेही हातात मिळेल त्या दांडुक्याने पतीला बदडलं. दोघांत तूफान हाणामारी झाल्यामुळे मुले ओरडायला लागली. शेवटी शेजारच्या नागरिकांनी मध्यस्थी करुन दोघांमधील वाद मिटवला.

मात्र, संतापलेल्या पत्नीने पोलिस स्टेशन गाठलं. पतीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दिली. मात्र, महिलेला पतीने मारहाण का केली याचे कारण कळताच पोलीस सुद्धा अचंबित झाले. शेवटी पोलिसांनी त्या महिलेची समजून घातली आणि आरोग्य विभागाला फोन केला. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आता महिला तिचा पती आणि मुलांच्या स्वॅब टेस्ट घेतल्या आहेत. अहवाल अजून आला नाही.

हेही वाचा..जगभरात वेगवेगळ्या रुपात थैमान घालतोय corona, संशोधनात व्हायरसची 3 रूपं आली समोर

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 11, 2020, 6:39 PM IST

ताज्या बातम्या