भांडणात झाला राग अनावर पतीने पत्नीच्या तोंडात कोंबला डांबर गोळ्यांचा कूट

भांडणात झाला राग अनावर पतीने पत्नीच्या तोंडात कोंबला डांबर गोळ्यांचा कूट

गेल्या काही दिवसांपासून फिरोज हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं या वादातून त्यांचे भांडण झाले होते.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 14 फेब्रुवारी : जगभरात आज प्रेमाचा दिवस म्हणून व्हेंलटाईन डे साजरा केला जात आहे. परंतु, भिवंडीमध्ये एका पतीने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा आवळून बळजबरीने तिच्या तोंडात डांबर गोळ्यांचा कूट कोंबून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयाच्या पाठीमागील एका खोलीत घडली आहे. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून आरोपी पती विरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करीत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहे. फिरोज खान (३०) असं आरोपी पतीचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा  रुग्णालयाच्या पाठीमागे अबूबकर यांच्या खोलीत आरोपी  फिरोज हा ३० वर्षीय पत्नीसह राहतो.मात्र, गेल्या काही दिवसांपासून फिरोज हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्यानं या वादातून त्यांचे भांडण झाले होते. त्यातच काल रात्रीच्या सुमारास फिरोज दारू पिऊन घरी आला असता. पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की, त्याने पत्नीला बेदम मारहाण करीत तिचा गळा आवळून तिच्या तोंडात डांबरगोळ्याचा कूट टाकून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण वेळीच शेजाऱ्यांनी धाव घेऊन तिची सुटका केली.

जखमी झालेल्या त्याच्या पत्नीला शेजाऱ्यांनी तातडीने स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेवून पंचनामा करीत आरोपी पती फिरोज विरोधात भादवी. कलम ३०७, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा अधिक तपास सह पोलीस निरीक्षण अमोल मोरे करीत आहेत.

भाऊजीने केली मेव्हण्याची हत्या

दरम्यान, बदलापूर पूर्वेच्या समर्थ नगर भागात इमारतीमधील घरात भाऊजीनेच मेव्हण्याची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पैशाच्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

मयत प्रभाकर वायाळ याचा भाऊजी अमर विश्वकर्मा याने डोक्यात हातोडा घालून मेव्हणा प्रभाकर याची निर्घृण हत्या केली आहे. समर्थ नगर भागातील शिवनेरी इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आरोपी विश्वकर्मा याच्या घरी प्रभाकर आला होता. यावेळी दोघांमध्ये पैशाच्या वादातून वादावादी झाली. ही वादावादी इतकी वाढली की तिचे तुंबळ हाणामारीत रूपांतर झाले.

यावेळी विश्वकर्मा याने घरातील लोखंडी हातोड्याने प्रभाकरच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. हा प्रहार इतका जोरदार होता की, प्रभाकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहू लागले. अखेर जास्त रक्तत्राव झाल्याने प्रभाकरचा जागीच मृत्यू झाला. यात आरोपी विश्वकर्मा हा देखील जखमी झाला असून त्याला बदलापूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

इलेक्ट्रेशनचा ठेका घेण्याचा दोघांचा संयुक्त व्यवसाय होता. याच व्यवसायातून पैशाच्या देवानघेवाणीमधून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. हत्येची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. आता या प्रकरणी प्रभाकर यांची बहीण आणि विश्वकर्मा याच्या पत्नीच्या फिर्यादीवरून विश्वकर्मावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बदलापूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published: February 14, 2020, 8:59 PM IST
Tags: Bhiwandi

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading