पती पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची चॉपरने हत्या, फरार आरोपी अखेर अटकेत

पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर पतीसह त्याच्या साथीदाराने धारदार चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली होती.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 14 फेब्रुवारी : पती-पत्नीच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणावर पतीसह त्याच्या साथीदाराने धारदार चॉपरने वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना  काही दिवसांपूर्वी शहरातील अजंठा कंपाऊंड परिसरात घडली होती. या घटनेतील मुख्य आरोपी इमरान रसूल सय्यद  (34 ) याला येथील जमावाने पकडून घटनेच्या दिवशीच पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आता त्याच्या फरार साथीदाराला थेट बंगळुरु येथून भोईवाडा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

अब्दुल रेहमान जलाल सय्यद ( वय 34 रा . अंधेरी पश्चिम ) असं मुसक्या आवळलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार इमराण याचे त्याच्या पत्नीशी भांडण झाले असता हे भांडण सोडवण्यासाठी मयत नदीम मोहम्मद अनिस मोमीन हा गेला असता. नदीम यांच्यामुळेच आपली पत्नी आपल्या सोबत नांदत नाही असा समज आरोपी इम्रानचा झाल्याने त्याने आपला मित्र अब्दुलच्या मदतीने भर रस्त्यात धारदार चॉपरने नदीमची हत्या केली होती.

हत्या केल्या नंतर या दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र, याठिकाणी असलेल्या जमावाने इम्रान यास पकडले आणि पोलिसांच्या हवाली दिले होते तर अब्दुल हा जमावासह पोलिसांच्या तावडीतून निसटला होता. त्याने थेट कर्नाटक बंगळुरु येथे पळ काढला होता. फरार झालेल्या अब्दुलचा भोईवाडा पोलीस कसून शोध घेत असतांनाच अब्दुल याने त्याच्या मोबाईलमधील सिम बदलला आणि आपल्या नातेवाईकांना फोन केला.

यावेळी त्याच्या मोबाईल फोनच्या आयएमईआयच्या आधारे सीडीआर आणि टॉवर लोकेशन पोलिसांना मिळाला. त्यानंतर भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या परवानगीने भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उप निरीक्षक गणेश मुसळे, पोलीस नाईक अरविंद गोरले, पोलीस शिपाई किशोर सूर्यवंशी, अतिश शिंगाडी यांच्या पथकाने 10 फेब्रुवारी रोजी थेट कर्नाटक बंगळुर इथं जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने अब्दुल याचा चुलत भाऊ रेहमत शाकिब शाह याच्या घरी धाड टाकली असता त्याठिकाणी फरार आरोपी अब्दुल आढळून आल्याने तिथेच त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

अब्दुल यास अटक करून बंगळुरु न्यायालयात हजर केले असता ट्रांजिस्ट वारंट घेऊन गुरुवारी त्यास भोईवाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. शुक्रवारी त्यास भिवंडी न्यायालयात हजार केले असता त्यास 20  फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असल्याची माहिती भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणराव कर्पे यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Feb 14, 2020 09:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading