कॅन्सरने गाठले,पतीने पत्नीला मुलांसह सोडून दिले;पहिल्या पतीने दिला आधार !

कॅन्सरने गाठले,पतीने पत्नीला मुलांसह सोडून दिले;पहिल्या पतीने दिला आधार !

न्यूज18 लोकमतने सातत्याने टेलिव्हिजन रिस्पेक्टीबिलिटी जपली आहे. आणि त्याचंच एक उदाहरण समोर आलंय.

  • Share this:

पिंपरी-चिंचवड 19 मे : न्यूज18 लोकमतने सातत्याने टेलिव्हिजन रिस्पेक्टीबिलिटी जपली आहे. आणि त्याचंच एक उदाहरण समोर आलंय. पिंपरीत एका रुग्णालयात पत्नी आणि 2 मुलांना सोडून गेलेल्या पतीची बातमी आम्ही दाखवली होती. पण ही बातमी पाहिल्यावर रुकसानाला घरी घेऊन जाण्यासाठी तिचा पहिला पती आला आहे.

मन हेलाऊन टाकणाऱ्या या बातमीमुळे अखेर या पीडितेच्या पतीला पाझर फुटला आणि तिला घेण्यासाठी सासू सासरे आणि पतीही इथे दाखल झाले, मात्र या संपूर्ण कथेतील हे वळण जरा आणखीनच  मनाचा ठाव घेणार आहे. कारण रुकसानाला घेन्यासाठी आलेला हां व्यक्ती, तिचा पहिला पती आहे,तर कॅन्सर ने मरण यातना भोगणारी रुकसाना नसून  तीच खरं नाव वंदना आहे. हे दोघेही औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील रहिवासी आहेत.

काही घरगुती कारणस्तव वंदना आपल्या या पतीला सोडून मुलांसमवेत  सलीम शेख नावाच्या व्यक्ती सोबत गेली होती. मात्र सलीम तीला अश्या अवस्थेत सोडून गेला आणि ही सगळी करून कहाणी न्यूज18 लोकमत ने दाखवली तेव्हा वंदनाचा हा पती ज्याचं नाव राजू सोळसे आहे, तो  आपल्या मूलं आणि पत्नीच्या ओढीने धाऊन आला आणि ही दुभंगलेली मन पुन्हा जुळली  आणि अनाथाची ससेहोलपट सहन करावी लागणार या दुःखाच्या भीतींने कोमजलेल्या या  मुलांच्या निरागास  चेहऱ्यावर हसु फुटलं.

या वेळी राजूने न्यूज18 लोकमतचे खास आभार मानले. आपला संसार पुन्हा जोमाने ऊभा करायचाय निर्धार केला आहे मात्र त्याला आता गरज आहे समाजाच्या आधाराची.

First published: May 19, 2018, 9:15 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading