मोराची शिकार करून मांस चंदनाच्या लाकडांवर शिजवलं

मोराची शिकार करून मांस चंदनाच्या लाकडांवर शिजवलं

  • Share this:

प्रफुल्ल खंदारे, बुलडाणा

19 जुलै : बुलडाणा जिल्ह्यातल्या लोणार सरोवराजवळच्या जंगलात चक्क राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराला मारून त्याचं मांस शिजवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

आरोपींनी एकच गुन्हा केलेला नाही. आरोपींनी अनेक गुन्हे केलेत. पहिला गुन्हा त्यांनी मोराची शिकार केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत त्यांनी चंदनाचं झाड तोडून त्याचा वापर सरपण म्हणून केला. अभयारण्यात बेकायदा आग पेटवली. लोणारच्या अभयारण्यात नेहमीच असे प्रकार घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.

मोराची शिकार झाल्याची तक्रार जेव्हा वनविभागाकडे केली. ते आले ते ही उशिरा... मग त्यांनी पाहिलं आणि त्यांनी सरकारी काम म्हणून गुन्हा दाखल केलाय.

या प्रकरणात फक्त गुन्हाच दाखल करुन भागणार नाही. तर वेगानं तपास करुन आरोपींना जेरबंद करण्याची गरज निर्माण झालीये. अन्यथा एक दिवस असा येईल ना लोणार अभयारण्य राहणार...ना तिथं वन्यजीव राहणार...

First published: July 19, 2017, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading