Home /News /maharashtra /

'नाणार'मुळे शिवसेनेतून जाणार, रत्नागिरीत शेकडो शिवसैनिक भाजपमध्ये दाखल

'नाणार'मुळे शिवसेनेतून जाणार, रत्नागिरीत शेकडो शिवसैनिक भाजपमध्ये दाखल

नाणार रिफायनरी (Nanar refinery project) समर्थनार्थ शिवसैनिकांचं शिवसेनेला 'सोडसत्र' सुरूच आहे.

रत्नागिरी, 19 जुलै : रत्नागिरी (Ratnagiri) नाणार रिफायनरीच्या मुद्यावरून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शिवसेनेला (shivsena) आणखी एक धक्का मिळाला आहे. नाणार रिफायनरी (Nanar refinery project) समर्थनार्थ शिवसैनिकांचं शिवसेनेला 'सोडसत्र' सुरूच आहे. सेनेच्या माजी शाखाप्रमुखासह 100 शिवसैनिकांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी आज शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याशिवाय शिवसेनेच्या चार माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचक्रोशीतील 100 हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यानी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ''मी पुढची 25 वर्ष भाजपमध्ये काम करणार'', देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीनं अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच आणि उपसरपंचासह गोवळ मधल्या ग्रामपंचायतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. जवळपास दीड वर्षांपूर्वी जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती. मात्र, तब्बल दीड वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलत नाही हे पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधुदूर्ग आणि रत्नागिरीचे भाजपचे जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. Weather Alert! आज मुंबईसह पुण्याला झोडपणार पाऊस; राज्यात 9 जिल्ह्यांना रेड अलर्ट 04 जुलै रोजी सुद्धा शेकडो शिवसैनिकांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन करत स्थानिक शिवसेना (Shivsena) कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये (BJP) जाहीर प्रवेश केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे. शिवसेना पक्षाकडून नाणार रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या लोकांचे दडपशाहीने निलंबन करण्यात येत होते. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठी खदखद पाहायला मिळत होती. त्यामुळे शिवसेनेत दोन मतप्रवाह निर्माण झाले. एका गटाने नाणार रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केलं आहे. तर दुसरा गट रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधी भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच  तारळ, कुंभवडे, अणुसुरे आणि मिठगवाणेमधील शिवसेना कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Ratnagiri

पुढील बातम्या