मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आरोग्य विभागाची वाढणार चिंता, शेकडो डॉक्टर होणार सेवानिवृत्त!

आरोग्य विभागाची वाढणार चिंता, शेकडो डॉक्टर होणार सेवानिवृत्त!

Doctors

Doctors

कोरोनाच्या काळात मोठ्या संख्येने डॉक्टरांची गरज असतांना अशा वेळी शासनाच्या हक्काचे असलेले डॉक्टर मोठ्या संख्येने एकाच वेळी निवृत्त...

मनमाड, 13 मे : राज्यावर कोरोनाचे (Maharashtra Corona case) संकट ओढावलेले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशातच येत्या 31 मे रोजी आणि त्यानंतर विविध जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि आरोग्य केंद्रावरील तब्बल 550 पेक्षा जास्त डॉक्टर सेवानिवृत्त ( retire doctors) होत आहे. एकाचवेळी शेकडो डॉक्टर निवृत्त होत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

डॉ.गोविंद नरवणे गेल्या 5 वर्षांपासून ते मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत आहे. मात्र आता त्यांचे वय 58 वर्ष झाले असल्याने ते 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. केवळ डॉ.नरवणेच नाही तर त्यांच्यासोबत राज्यातील विविध भागात कार्यरत असलेले 550 डॉक्टर सेवानिवृत्त होणार आहे.

‘कर्ज होत...जुनी सेकंड हॅन्ड कार वापरयचो आम्ही...’आदिनाथने सांगितला होता कठीण..

कोरोनाच्या काळात मोठ्या संख्येने डॉक्टरांची गरज असतांना अशा वेळी शासनाच्या हक्काचे असलेले डॉक्टर मोठ्या संख्येने एकाच वेळी निवृत्त होत असल्यामुळे आरोग्य व्यवस्थेतवर त्याचा परिणाम होईल. त्यामुळे शासनाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संघटनेनं केली आहे. शासनासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

नाशिकच्या ग्रामीण भागात म्युकर मायकोसिसचा शिरकाव

दरम्यान, नाशिकच्या ग्रामीण भागात ही म्युकर मायकोसिस या नव्या आजाराचा शिरकाव झाला आहे. येवल्यात चार तर लासलगावमध्ये 6 असे 10 रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. येवल्याचे नेत्ररोग तज्ञ डॉ. अविदत्त निरगुडे यांनी या रुग्णांची तपासणी केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील नेत्ररोग तज्ञांकडे उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला आहे.

First published: