मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जनता कर्फ्यूत माणुसकीचं दर्शन, पोलिसांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसुती

जनता कर्फ्यूत माणुसकीचं दर्शन, पोलिसांच्या मदतीने महिलेची सुखरुप प्रसुती

पोलिसांनी ऐनवेळी केलेल्या मदतीने महिला व बाळाचे प्राण वाचले.

पोलिसांनी ऐनवेळी केलेल्या मदतीने महिला व बाळाचे प्राण वाचले.

पोलिसांनी ऐनवेळी केलेल्या मदतीने महिला व बाळाचे प्राण वाचले.

जामनेर, 22 मार्च: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज रविवारी जनता कर्फ्युला हाक दिली आहे. मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दुसरीकडे जामनेरमध्येही जनता कर्फ्यूला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व वाहने बंद आहेत. त्यात एका गरोदर महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. तिला दवाखाण्यात हलवणे अत्यावश्यक होते. परंतु महिलेला दवाखाण्यात नेण्यासाठी कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी जामनेर पोलिसांना या घटनेची ताबडतोब माहिती दिली. जामनेर पोलिसांनी संबंधित महिलेचं घर गाठून तिला पोलिस व्हॅनमधून तात्काळ जामनेर ग्रामीण रुग्णालयात हलवले. त्यानंतर डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेची सुखरुप प्रसुती केली. बाळ व बाळंतीण सुखरूप असल्याची माहिती दिली. पोलिसांनी ऐनवेळी केलेल्या मदतीने महिला व बाळाचे प्राण वाचले. जामनेर पोलिसांनी माणुसकीचं दर्शन घडवल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा.. सलाम! पोलीस ठरले भिकाऱ्यांचा आधारवड, बंद काळात निराधारांना अशी केली मदत

उद्यापासून महाराष्ट्रभर कलम 144 लागू

'दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. आपल्याला या संकटावर मात करायची आहे. उद्या सकाळपासून महाराष्ट्रभर कलम 144 लागू करणार,' अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे उद्या (सोमवार) सकाळपासून महाराष्ट्रातील कोणत्याही भागात 5 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. 5 पेक्षा जास्त लोक एका ठिकाणी जमल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

हेही वाचा...लॉक डाऊन म्हणजे नेमकं काय? उद्यापासून 31 मार्चपर्यंत महाराष्ट्रात असे असतील नियम

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढला..

महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. गेल्या काही तासांमध्ये मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे नवे रुग्ण समोर आले आहे. मुबईत 6 तर पुण्यात 4 असे 10 नवीन रुग्णांचा पॉझिटिव्ह अहवाल आला आहे. त्यामुळे राज्यात भीतीचं वातावरण आहे. हे रुग्ण कोण आहेत आणि यांना कोरोनाची लागण कशी झाली याचा आता आरोग्य विभागाकडून तपास सुरू आहे. दरम्यान, आज कोरोनामुळे राज्यात आणखी एक मृत्यू झाला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण देशात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा आणखी एक मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा दुसरा मृत्यू झाला. एका 56 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील हा दुसरा मृत्यू आहे.

First published:
top videos