पुणे, 27 मे : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बारावीच्या निकालांची शक्यता असल्याची बातमी येत होती. महाराष्ट्र बोर्डाने आता बारावीच्या निकालांची तारीख जाहीर केली आहे. बोर्डाने News18 Lokmat ला दिलेल्या माहितीनुसार, HSC म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल 28 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार आहेत.
उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे म्हणजे बारावीचे निकाल तुम्ही आमच्या वेबसाईटवर थेट बघू शकता. ऑनलाईन निकाल कसे बघायचे यासाठी स्क्रोल डाऊन करून खालचा परिच्छेद पाहा. गेल्या वर्षी 10 वी चा निकाल 89.41 टक्के एवढा होता आणि 12 वी चा निकाल 88.41 टक्के होता. गेल्या वर्षी 30 मे रोजी निकाल लागला होता. यंदा दोन दिवस अगोदर बारावीचा रिझल्ट विद्यार्थ्यांच्या हाती येणार आहे.
अधिकृत वेबसाइटवर निकाल
बोर्डाच्या अधिकृत बेवसाईटवर दुपारी 1 वाजता निकात जाहीर होतील. त्याच वेळी News18Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येतील. HSC चे विद्यार्थी MSBSHSE बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवर निकाल पाहू शकतात.
राज्यात 12 वी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात झाली होती. तर 10 वी परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या काळात घेण्यात आली. दहावी आणि बारावीचे निकाल mahresult.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला मिळू शकतील.
VIDEO : दहावी-बारावीनंतर पुढे काय? कसं निवडाल करिअर? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - १ )
वेगळ्या क्षेत्रांत कसं मिळवाल यश ? सांगत आहेत अविनाश धर्माधिकारी (भाग - 2)
दहावीचे निकाल पहिल्या आठवड्यात?
बारावीपाठोपाठ दहावीचे निकाल जून 2019 च्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. याबाबत बोर्डाकडून अद्याप अधिकृतपणे तारीख जाहीर झालेली नाही. निकालाच्या आधी 2 दिवस तारीख जाहीर होईल.
SPECIAL REPORT: रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?