आॅल द बेस्ट !, उद्या बारावीचा निकाल

आॅल द बेस्ट !, उद्या बारावीचा निकाल

. उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

  • Share this:

29 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख अखेर निश्चित झालीये. उद्या 30 मे रोजी दुपारी 1 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

बारावीचा निकाल कधी लागणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून सोशलमीडियावर उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यामुळे अफवांना पेव फुटला होता. अखेर मंडळाने अधिकृत तारीख स्पष्ट केलीये. उद्या दुपारी 1 वाजता आॅनलाईन निकाल पाहता येणार आहे.

राज्य मंडळातर्फे राज्यातील 15 लाख 5 हजार 365 विद्यार्थ्यांची बारावीची परीक्षा घेण्यात आली. त्यात 8 लाख 48 हजार 929 मुलांचा तर 6 लाख 56 हजार 436 मुलींचा समावेश आहे. त्याच प्रमाणे विज्ञान शाखेच्या 5 लाख 59 हजार 423 विद्यार्थ्यांनी तर कला शाखेच्या 5 लाख 9 हजार 124 विद्यार्थ्यांनी आणि वाणिज्य शाखेच्या 3 लाख 73 हजार 870 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. तसंच द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या 62 हजार 948 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षा सुमारे दहा दिवस उशिराने सुरू झाल्या. त्याच सुरूवातीच्या काळात काही कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार घातला. मात्र, काही दिवसांनी उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरळीत सुरू झाले. गेल्या वर्षी 25 मे रोजी बारावीचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदा 5 दिवस उशिराने निकाल जाहीर केला जात आहे,असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितलं.

विद्यार्थी आपला निकाल बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहू शकतील. याच वेबसाईटवर निकाल डाऊनलोडही करता येईल.

या वेबसाईटवर पाहू शकता निकाल

mahresult.nic.in

mahresult.nic.in

results.nic.in

examresults.net

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 29, 2017 04:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading