Elec-widget

गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उरलेत शेवटचे 3 दिवस; असे अपलोड करा फोटो

गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उरलेत शेवटचे 3 दिवस; असे अपलोड करा फोटो

इको फ्रेंडली घरगुती गणपती सजावट स्पर्धा, लहान मुलांसाठी बालगणेश चित्रकला स्पर्धा आणि सर्वोत्कृष्ट फोटोसाठी बेस्ट गणेशोत्सव मोमेंट अशा तीन स्पर्धा News18 lokmat ने आयोजित केल्या आहेत. त्यात सहभागी कसं व्हायचं?

  • Share this:

मुंबई :लाडक्या बाप्पाचा उत्सव शेवटच्या टप्प्यात आलाय. या उत्सवी वातावरणाचे क्षण तुम्ही कॅमेऱ्यात टिपलेच असतील. ते आम्हाला पाठवा Best Ganeshotsav Moment स्पर्धेसाठी तुमची एंट्री पाठवायला शेवटचे तीन दिवस राहिले आहेत. News18 Lokmat ने यंदा गणेशोत्सवानिमित्त तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तुमच्या घरच्या बाप्पाची आरास कशी केली आहे, हे आम्हाला पाठवा. निसर्गपूरक आरास असेल तर इको फ्रेंडली गणपती सजावट स्पर्धेसाठी तातडीने फोटो काढून पाठवा. तुमच्या घरातल्या छोट्यांनी काढलेलं बाप्पाचं चित्रही अपलोड करा. बालगणेश चित्रकला स्पर्धा 12 वर्षांखालील मुला-मुलींसाठी खुली आहे.

घरबसल्या होईल 'राजाचं' Live दर्शन

News18lokmat.com या आमच्या वेबसाइटवर गणेशोत्सवानिमित्त खास विभाग सुरू आहे. त्यामध्ये तुम्ही लालबागच्या राजाचं LIVE दर्शन घेऊ शकता - अगदी 24 तास. त्यासाठी आमच्या वेबसाईटवरच्या सर्वकार्येषु सर्वदा गणेशोत्सव 2019 या वर क्लिक करा. लालबागच्या मांडवातून थेट स्ट्रीमिंग करण्यात येत आहे. याशिवाय बेस्ट गणेशोत्सव मोमेंट, बाल गणेश चित्रकला स्पर्धा आणि इको फ्रेंडली घरगुती गणपती स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

स्पर्धांसाठी एंट्री कशी पाठवाल?

Loading...

बेस्ट गणेशोत्सव मोमेंट  : गणपती उत्सवातला तुम्हाला भावलेला क्षण कॅमेऱ्यावर क्लिक करून आम्हाला पाठवा. गणपती, सजावट, माणसं, कार्यकर्ते, संगीत, नृत्य, पूजा, प्रसाद, देखावे, सुरक्षा... या कशातही बेस्ट मोमेंट सापडू शकेल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करा. तिथे तुमचं पूर्ण नाव, इ मेल आयडी आणि मोबाईल नंबर टाका आणि अपलोड असं लिहिलंय तिथे क्लिक करा. त्यावरून तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करता येईल. गणेशोत्सवाचा मूड टिपणारा सर्वोत्कृष्ट फोटो बक्षीसपात्र ठरेल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

बाल गणेश चित्रकला स्पर्धा : तुमच्या छोट्यांनी चितारलेला गणेश आम्हाला पाठवा. मुलांनी (वयोगट 12 च्या आत ) काढलेली गणपतीची चित्र यासाठी विचारात घेतली जातील. स्पर्धेत भाग घेण्यासाठी इथे क्लिक करून तुमची माहिती भरा आणि चित्राचा फोटो काढून/ स्कॅन करून दिलेल्या फॉर्ममध्ये अपलोड करा. ही स्पर्धा 12 वर्षांच्या आतल्या मुला-मुलींसाठी आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

इको फ्रेंडली घरगुती गणपती : घरच्या गणपतीची सजावट पर्यावरणाचा सजगपणे विचार करून ठरवली असेल तर आम्हाला जरूर फोटो पाठवा. त्यासाठी इथे क्लिक करा. सर्वोत्कृष्ट सजावट आणि पर्यावरणाचा पुरेपूर विचार लक्षात घेऊन विजेते ठरवण्यात येतील. या लिंकवर क्लिक करा.

फोटो अपलोड कुठे करायचे?

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर गणेशोत्सव 2019 वर क्लिक करा. लालबागच्या राजाचं लाइव्ह दर्शन तुम्हाला तिथे घेता येईल. शिवाय खाली स्क्रोल केलं की तिन्ही स्पर्धांचे आयकॉन दिसतील. त्यावर क्लिक केलं की, Play Contest असा पर्याय येईल. त्यावर क्लिक केलं की, एक छोटा फॉर्म ओपन होईल. त्या फॉर्ममध्ये तुमचं नाव, इ मेल आणि मोबाईल नंबर लिहून तुमचा फोटो (.jpeg format )अपलोड करता येईल.

हे फोटो आमचं परीक्षक मंडळ पाहील आणि त्यातून सर्वोत्कृष्ट फोटोची आणि चित्राची निवड करण्यात येईल. विजेत्यांना बक्षिसं दिली जातील.

जगातील आक्रमक हेलिकॉप्टर भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात, पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 07:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...