VIDEO :'आंबेनळी घाटात बस कोसळली कशी ?,सीआयडी चौकशी करा'

VIDEO :'आंबेनळी घाटात बस कोसळली कशी ?,सीआयडी चौकशी करा'

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे 30 कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत मृत्यू झाला. या बस दुर्घटनेतून केवळ प्रकाश सावंत देसाई हे एकमेव अधिकारी बचावले

  • Share this:

रत्नागिरी, 03 आॅगस्ट : आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आणि बसमधील ३० जणांचा मृत्यू झाला. हृदय हेलावून टाकणाऱ्या या घटनेत प्रकाश सावंत देसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारक रित्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली. मात्र आता हेच प्रकाश सावंत संशयाच्या भोवऱ्यात आलेत. अपघातातून बचावलेल्या प्रकाश सावंत देसाई यांची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केलीये.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे 30 कर्मचाऱ्यांचा आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत मृत्यू झाला. या बस दुर्घटनेतून केवळ प्रकाश सावंत देसाई हे एकमेव अधिकारी बचावले आहेत. आपण कसं बचावलो, याबद्दल त्यांनी सांगितलं. तसंच  अपघात कसा घडला याबद्दल सावंत यांनी खुलासे केले. पण  त्यांनी अनेक वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत तफावत आहे. त्यामुळे या अपघाता बद्दल संशय घेतला जातोय. दापोलीचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी देसाई कसे वाचले याबद्दल संशय येतोय. ते जसे वाचले त्याबद्दल सीआयडी चौकशी करून सत्य बाहेर आलं पाहिजे अशी मागणी दळवी यांनी केली.

दळवी यांनी विद्यापीठ आणि मुख्यमंत्र्यांकडे सखोल चौकशीची मागणी केली आहे. कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याशी सविस्तरपणे चर्चा सुद्धा केलीये.

देसाई काय म्हणाले होते ?

अचानक बस दरीत कोसळली. काय घडतंय काही कळत नव्हतं. बसमधून कोसळल्यानंतर मी एक झाडाची फांदी पकडली. जर ती फांदी तुटली असतीतर मी सुद्धा त्यांच्यासोबत खोल दरीत गेलो असतो. झाडांचा बुंधा पकडला, तरी हात सटकत होता...कधी मातीत हात घालून, तर कधी झाडांना पकडून कसाबसा वर आलो. बस कोसळ्यानंतर प्रचंड आवाज झाला होता. तो आवाज ऐकून बाजूलाच असलेल्या धबधब्यातून वर आले. त्यातील एका इसमाने मला मोबाईल दिला आणि मुंबईला निघून गेला. मला जे नंबर आठवत होते त्यांना फोन केला. मला माझा मित्र अजितचा नंबर लक्षात होता त्याला फोन केला. त्यानंतर पोलीस स्टेशनचा नंबर पाठ होतो तिथे फोन केला. मग त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले. घाटात रस्त्यावर मातीच्या ढिगार होते त्यावरून बसचे चाक घसरले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरतच गेली. मला जी नावं आठवत होती ती सगळी नावं सांगितली.

बस दरीत कोसळण्याआधी काय घडलं ?

कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्वरला सकाळी 6.30 च्या सुमारास निघाली होती. शनिवार आणि रविवार सलग दोन दिवस जोडून आल्यामुळे महाबळेश्वरला ही सहल निघाली होती. यासाठी एक खासगी बस भाड्याने घेण्यात आली होती. एकूण 32 जण या सहलीत सहभागी झाले होते. सकाळी 10.30 च्या सुमारास बस आंबेनळी घाटात पोहोचली. रस्त्याच्या बाजूला मातीचे ढिगार तयार करून ठेवले होते त्यावर बसचे चाक सरकले आणि बस दरीत डाव्याबाजूला घसरली. काही कळायच्या आतच बस दरीत कोसळली. बस जेव्हा दरी घसरत होती तेव्हा मी बसमधून बाहेर फेकला गेलो आणि वाचलो.

मी जिथे पडलो तिथून बस खूप आली कोसळली होती. मला तिथपर्यंत जाणे शक्य नव्हते. आमच्यासोबत आणखी सहकारी दुसऱ्या गाडीने मागून येत होते. मी कसाबसा घाट चढून बाहेर आलो. रस्त्यावर आल्यावर तिथे मोबाईलला रेंज नव्हती. रस्त्यावर आल्यानंतर तिथून फोन केला. मला माझा एक मित्र अजितचा फोन नंबर लक्षात होता त्यालाच फोन केला आणि घटनेची माहिती दिली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी आम्हाला फोन केला. तेव्हा घडलेली सगळी हकीकत सांगितली.

First published: August 3, 2018, 4:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading