सनी लिओननं कसं शोधलं निशाला?

सनी लिओननं कसं शोधलं निशाला?

उदगीर तालुक्यातल्या संधी निकेतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शिशुगृह उदगीर येथे असलेली 21 महिन्यांची निशा नावाची मुलगी सनीला पसंत पडली होती.

  • Share this:

नितीन बनसोडे, 22 जुलै : गेल्या मे महिन्यात सनी लिओन एका जिमच्या उदघाटनासाठी लातुरात आली होती.  त्यावेळी तिचा पती डॅनियल देखील तिच्या सोबत होता , सनीला तिच्या पतीसोबत पाहून अनेकांनी तर्क वितर्क लावले, मात्र आता त्या सर्व चर्चेला पूर्ण विराम मिळालाय. कारण सनी फक्त जिमच्या उदघाटनासाठीच आली नव्हती तर ती एका 21 महिन्याच्या मुलीला पाहण्यासाठी देखील आली होती.

उदगीर तालुक्यातल्या संधी निकेतन शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित शिशुगृह उदगीर येथे असलेली 21 महिन्यांची निशा नावाची मुलगी सनीला पसंत पडली होती. त्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 15 जुलै रोजी सनी आणि डॅनियल हे दोघे उदगीरला आले आणि  निशाला घेऊन मुंबईला गेले आणि अशा प्रकारे सनीला आई बनण्याची संधी मिळाली.

कोण आहे निशा ?

- 15 ऑक्टोबर 2015 रोजी मुलीला उदगीरच्या शिशुगृहात आणलं

- मुलीला सांभाळणं शक्य नसल्यानं आईनं मुलीला शिशुगृहात दिलं

- शिशुगृहातच तिचं नाव 'निशा' ठेवण्यात आलं

- खऱ्या आईला नको असलेल्या निशाला आता हक्काची आई मिळाली

- त्यामुळे निशाचं भवितव्य आता उज्ज्वल बनलंय

 

कसं शोधलं निशाला सनीनं ?

- मूल दत्तक घेण्यासाठी सनीनं 'CARA' च्या वेबसाईटवर नाव नोंदवलं

- उपलब्ध असलेल्या मुलांचे फोटो सनीला पाठवण्यात आले

- पसंत असलेल्या मुलीची सनीनं भेट घेतली

- कायदेशीर प्रक्रियेनंतर सनीला ही मुलगी सोपवण्यात आली

First Published: Jul 22, 2017 06:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading