नवी दिल्ली, 22 मार्च : भारतातील काही बहुचर्चित प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक नाव म्हणजे आयएएस ऑफिसर टीना डाबी होय. टीना दाबी या या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्यांचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. टीना यांनी गेल्या वर्षी आयएएस अधिकारी प्रदीप गावंडे यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. हे त्यांचं दुसरं लग्न होतं. त्यांनी पहिलं लग्न जम्मू-काश्मीर कॅडरचे आयएएस ऑफिसर अतहर आमीर खान यांच्याशी केलं होतं. दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर टीना यांनी प्रदीप यांच्याशी लग्नगाठ बांधली.
घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं होतं -
दरम्यान, घटस्फोटानंतरचे आयुष्य किती कठीण होते? त्या काळात तुम्ही काम आणि आयुष्याचा समतोल कसा साधला? त्यांना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागला? याबाबत त्यांनी भाष्य केलंय. लाईव्ह हिंदुस्तान या न्यूज पोर्टलने याबाबतचे वृत्त दिलंय.
टीना डाबीने एका मुलाखतीत सांगितले होते, हे माझे दुसरे आणि प्रदीपचे पहिले लग्न आहे. घटस्फोटानंतरचं आयुष्य कसं होतं, याबाबत ते म्हणाल्या की, घटस्फोटाचा अनुभव हा फार वेदनादायक आहे. तुम्हाला भावनिकदृष्ट्या खाली करुन टाकतो. त्या कठीण प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी मी स्वतःला कामात खूप व्यस्त ठेवले आणि कुटुंबासोबत वेळ घालवला.
टीना डाबी म्हणाल्या की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मे 2021 मध्ये लातून येथील सुपूत्र प्रदीप गावंडे आणि मी आरोग्य विभागात एकत्र होतो. त्यादरम्यान आमची भेट झाली. आधी आम्ही दोघे एकमेकांना मित्र म्हणून ओळखले. मग एकमेकांच्या कुटुंबाबत जाणून घेतलं. हे सगळं वर्षभर चाललं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तुझ्या आणि प्रदीपच्या वयात 12 वर्षांचा फरक आहे. लोक यावरही कमेंट करत आहेत. लोक अजूनही वयाच्या फरकाबद्दल इतका विचार का करतात? यावर प्रतिक्रिया देताना टीना डाबी म्हणाल्या की, प्रत्येकाचे स्वतःचे मत असू शकते. मला असे वाटते की, लग्नासारख्या महत्त्वाच्या निर्णयात केवळ वय हा निर्णायक घटक असू शकत नाही. स्वभाव, सुसंगतता आणि परस्पर समंजसपणा जास्त महत्त्वाचा आहे. काही महिने मित्र म्हणून राहिल्यानंतर प्रदीपने मला प्रपोज केले.
ते खूप दयाळू व्यक्ती आहेत. माझ्या कुटुंबात सर्वजण खूप आनंदी आहेत. त्यांना एक डॉक्टर असलेली सून मिळाली आहे. राजस्थान केडरमधील आयएएस असण्याबरोबरच ते एक महान माणूस देखील आहेत. याशिवाय प्रदीपप्रमाणे माझ्या आईच्या बाजूचे कुटुंबही मराठी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Divorce, Ias officer, Latur, Marriage