मुंबई, 24 मार्च : आगमी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 240 जागा तर शिवसेनेला 48 जागा असं वक्तव्य काही दिवसांपूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं, शिवसेना शिंदे गटाच्या अनेक नेत्यांनी बावनकुळेंच्या वक्तव्यार प्रतिक्रिया दिल्या. आता जागावाटपाच्या मुद्द्यावर नवनियुक्त शिवसेना संसदीय पक्षाचे मुख्यनेते गजानन किर्तीकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले किर्तीकर?
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये 2019 चा युतीचा फार्मूला लागू होईल, लोकसभेत 22 तर विधानसभेत 126 जागांवर शिवसेना लढेल. सोबतच लोकसभा आणि राज्यसभेमध्ये शिवसेना ठाकरे गटात असलेल्या खासदार आणि आमदारांवर व्हिप लागू होणार नसल्याचं गजानन किर्तीकर यांनी लोकमत न्यूज 18 संवाद साधताना म्हटलं आहे.
बावनकुळेंनी काय म्हटलं होतं?
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या वाट्याला 240 तर शिवसेनेच्या वाट्याला 48 जागा असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. मात्र त्यावरून वाद होण्याची चिन्ह दिसताच त्यांनी स्पष्टीकरण देखील दिलं होतं. बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी भाजपची भूमिका स्पष्ट केली होती. भाजपने विधानसभेच्या 288 जागांसाठी तर लोकसभेसाच्या 48 जागांसाठी तयारी सुरू केली आहे. सध्या जागावाटपावर कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र आमच्या तयारीचा फायदा हा शिवसेना शिंदे गटाला होईल असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.