VIDEO : धनंजय मुंडेंची पंकजांवर टीका, विचारला थेट सवाल

VIDEO : धनंजय मुंडेंची पंकजांवर टीका, विचारला थेट सवाल

'बीड येथील पोलीस अधीक्षक यांना बदली करून जायचे आहे. म्हणून ते बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीत'

  • Share this:

सुरेश जाधव, प्रतिनिधी

बीड, 01 फेब्रुवारी : 'बीडच्या पालक मंत्री पंकजा मुंडे स्वत:ला बीडच्या गृहमंत्री समजतात. मग, जिल्ह्यात एवढे गुन्हे कसे होतात', असा सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.

वडवणी तालुक्यातील ब्रह्मनाथ तांडा येथील छेडछाडीमुळे आत्महत्या केलेल्या स्वाती राठोड हिच्या कुटुंबीयांची धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. स्वातीच्या कुटुंबीयांना भेट देऊन सांत्वन केलं.

यावेळी बोलतांना धनंजय मुंडे यांनी, 'बीड जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. पोलीस अधीक्षक यांना बदली करून जायचे आहे. म्हणून ते जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्याचा प्रयत्न करत नाहीत', असा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी केला.

'जिल्ह्यांत कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र दिसत आहे. सुमित वाघमारे प्रकरण असो, की स्वाती राठोड यांची आत्महत्येची घटना असो, जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. पंकजा मुंडे स्वतःला गृहमंत्री समजतात तर मग गुन्हेगारीचे प्रमाण का वाढत आहे? असा सवालही त्यांनी विचारला.

===========================================

First published: February 1, 2019, 5:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading