Home /News /maharashtra /

आधुनिक शेती कशी करतात? दोन्ही पायांनी अपंग असताना तरुणाचे शेतात नवनवे प्रयोग

आधुनिक शेती कशी करतात? दोन्ही पायांनी अपंग असताना तरुणाचे शेतात नवनवे प्रयोग

दोन्ही पायांनी 100 टक्के अपंग असूनदेखील रुपेश पवार या तरुणाने जिद्द व आत्मविश्वासाच्या बळावर शेतीमध्ये विविध प्रयोग करून जीवन जगण्याची उमेद कायम ठेवली आहे.

दापोली, 6 जून : दापोली कोकण कृषी विद्यापीठ व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग शेतकऱ्यांनी गादीवाफे भात पेरणी केली आहे. गादी वाफ्यावर भात पेरणी करण्यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे पवार यांना मार्गदर्शन लाभले असून महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांचे मोलाचे सहकार्य रुपेश पवार यांना लाभले आहे. मंडणगड तालुक्यातील विन्हे येथील प्रयोगशील शेतकरी रूपेश पवार हे दोन्ही पायाने 100% दिव्यांग असूनसुद्धा त्यांची शेतीतील विविध प्रयोग करण्याची धडपड वाखाणण्यासारखी आहे. अपंगत्वावर मात करत ते आजही सुखी समाधानाने शेती करत आहेत. मंडणगडच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली यंदा गादीवाफ्यावर भात पेरणीचा प्रयोग त्यांनी केला आहे. सद्या भात शेतीचा हंगाम आहे. चारसुत्री, एसआरटीचे नवनवीन तंत्रज्ञान आले. तरीही बहुतांशी शेतकरी आजही पारंपरिक पदधतीने भात शेती करीत आहेत. पारंपारिक पद्धतीमध्ये पालापाचोळा, शेणी, गवत भाजून भाजवळ करण्याची, दाढ भाजण्याची पद्धतीचा शेतकरी आजही अवलंब करीत आहेत. हे ही वाचा-कोरोनाच्या निगेटिव्ह वातावरणात कसं राहाल आनंदी; तज्ज्ञांनी दिला Happiness मंत्र या पद्धतीने रोपे तयार केली तर लावणीच्या वेळी रोपे काढायला भरपूर वेळ लागतो व रोपेही तुटतात. मात्र हाच भात गादीवाफ्यावर रांगेत पेरला की रोपे काढायला हलकी असतात. यासाठी वेळ कमी लागतो आणि बियाणेही कमी लागते. रोपेही तुटत नाहीत. अशा पद्धतीने गादीवाफ्यावर रोपे तयार करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती मी पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांना केली. पौनीकर व त्यांचे सहकारी कृषी विस्तार अधिकारी पवन गोसावी यांनी आज माझ्या शेतावर येवून गादीवाफा तयार करून त्यावर भात पेरण्याचे प्रात्यक्षिक दाखवल्याची माहिती रूपेश पवार यांनी दिली. यासाठी प्रोऍग्रो कंपनीचे अराईज 6444 या संकरीत बियाण्याचा वापर करण्यात आला. दापोली कोकण कृषी विद्यापीठ मंडणगड पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली प्रगतशील शेतकरी रुपेश पवार शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Dapoli, Farmer, Positive story

पुढील बातम्या