BREAKING : नालासोपारा स्फोटक प्रकरणामुळे उलगडला दाभोळकरांच्या हत्येचा कट

BREAKING : नालासोपारा स्फोटक प्रकरणामुळे उलगडला दाभोळकरांच्या हत्येचा कट

नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीनेच दाभोळकरांच्या हत्येचा कट रचला होता.

  • Share this:

अजित मांढरे, प्रतिनीधी

मुंबई, 18 ऑगस्ट : नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात सीबीआयने मोठी कारवाई केली आहे. नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. यात सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे नालासोपारा स्फोटक प्रकरणातील आरोपीनेच दाभोळकरांच्या हत्येचा कट रचला होता. तब्बल 5 वर्षांनंतर दाभोळकर हत्या प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींपैकी एकाचा थेट दाभोळकर हत्या प्रकरणात सहभाग आहे. त्यामुळे आता या प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

दाभोळकरांची हत्या करण्यामागे आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणात आमचा हात असल्याची कबूली आरोपींनी तपासा दरम्यान दिली आहे. वैभव राऊतटीम मधील एकाने अशी कबूली दिली आहे. नालासोपारा स्फोटक प्ररकणाचा तपास करत असलेल्या एटीएसने अशी माहिती सीबीआयला दिली आणि त्यावरून दाभोळकर हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्यामुळे एटीएस आणि सीबीआय आता याचा वेगळ्या पद्धतीने शोध घेत आहे.

नरेंद्र दाभोळकरांवर गोळी झाडणा-याला सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. सचिन अणदूरे असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. औरंगाबादमधून सचिन अणदूरेला सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. तब्बल 5 वर्षानंतर दाभोळकर प्रकरणात दुसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

डॉ. नरेंद्र दाभोळकरांवर गोळ्या झाडणाऱ्याला सीबीआयने केली अटक

डॉ.नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रे़ड गोविंद पानसरे यांच्या हत्येला पाच वर्ष पूर्ण होत आहेत आणि आता कुठे त्यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यात सीबीआयला यश आलं आहे. दरम्यान, सीबीआय आता आरोपीची कसून चौकशी करत आहेत. त्यामुळे यात आणखी कोणाचा हात आहे का आणि कोणाच्या या सांगण्यावरून हे सगळं करण्यात आलं आता याचाही लवकरच उलघडा होईल का याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धाविरोधात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचं केंद्र होतं पुणे. पुण्यातून निघणार्‍या साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली. दुदैर्व म्हणजे याच पुण्यात त्यांचा खून झाला.

डॉ.नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी दोघंही हल्लेखोर बाईकवर बसून परागंदा झाले.

 

केरळमध्ये 'मृत्यू'चा महापूर, पहा हे भीषण PHOTOS

First published: August 18, 2018, 9:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading