पुणे, 11 जुलै- शहरात दिवसभर सुरु असलेल्या पावसामुळे पुलगेट बसस्थानक, साईबाबा मंदिराशेजारी असलेल्या एका जुन्या दुमजली घराची भिंत कोसळली. तसेच लगतच घरामध्ये असलेला जिनाही पडला. एका कुटूंबातील सहा जणांना वरच्या मजल्यावरुन अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर व शिडीच्या मदतीने सुखरूप खाली उतरवले. यामधे ज्येष्ठ महिलेसह दोन लहान मुलांचा देखील समावेश होता.
या कामगिरीमध्ये केंद्र प्रमुख प्रमोद सोनवणे, वाहनचालक मेहबूब शेख, तांडेल राजेंद्र पायगुडे व जवान राहूल नलावडे, संदिप घडशी, संजय सकपाळ, अतुल खोपडे तसेच पुणे कँन्टोमेंट अग्निशमन जवानांनी परिश्रम घेतले.
लष्कर परिसरातील जुनी दुमजली इमारत कोसळली
लष्कर परिसरातील जुनी दुमजली इमारत गुरूवारी कोसळली. कुरेशी मज्जीद जवळील घटना घडली. घटनेत कुठलीही जीवित हानी नाही. ढिगारा हटविण्याची काम सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली आहे.
पनवेलमध्ये पुरात वाहून गेलं दाम्पत्य, 4 दिवसांनी सापडला पतीचा मृतदेह
दुसऱ्या एका घटनेत पनवेलमधील गाढी नदीच्या पुरात दाम्पत्य वाहून गेलं आहे. चार दिवसांनी एकाचा मृतदेह सापडला आहे. आदित्य आणि सारिका आंब्रे असे दाम्पत्याचे नाव आहे. चार दिवसांच्या शोध मोहिमेनंतर पती आदित्य आंब्रे यांचा मृतदेह सापडला आहे. सारिका आंब्रे अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे. मिळालेली माहिती अशी की, आदित्य आणि सारिका हे दाम्पत्य बाईकसह गाढी नदीच्या पुरात वाहून गेलं होतं. गाढी नदीच्या पुरामुळे उमरोली गावाचा संपर्क तुटला होता.
पाण्याखाली गेलेल्या पुलावरून आंब्रे दाम्पत्य बाईक वरून जात होते. त्याचवेळी ते वाहून गेले होते. मागील चार दिवसांपासून त्यांचा शोध घेण्यात येत होता. आदित्य आंब्रे यांचा मृतदेह सापडला आहे. सारिका आंब्रे अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
बापाने मुलाला बंदुकीत भरायला लावल्या बुलेट्स, भलतेच संस्कार देणारा VIDEO व्हायरल