मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

अवघ्या 3 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य; घरमालकाने 10 रुपयाच्या बहाण्याने बोलावलं अन्...

अवघ्या 3 वर्षांच्या मुलीसोबत घृणास्पद कृत्य; घरमालकाने 10 रुपयाच्या बहाण्याने बोलावलं अन्...

जळगावातील एका 25 वर्षीय तरुणानं 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार (rape on minor girl) बनवलं आहे.

जळगावातील एका 25 वर्षीय तरुणानं 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार (rape on minor girl) बनवलं आहे.

जळगावातील एका 25 वर्षीय तरुणानं 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार (rape on minor girl) बनवलं आहे.

    जळगाव, 09 ऑक्टोबर: जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील दहिगाव याठिकाणी एक संतापजनक घटना घडली आहे. येथील एका 25 वर्षीय तरुणानं 3 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार (rape on minor girl) बनवलं आहे. नराधम आरोपीनं दहा रुपये देण्याचं आमिष दाखवत (Give lure of 10 rupees) पीडित मुलीला घरात घेऊन गेला आणि याठिकाणी नराधमानं निष्पाप मुलीला नरक यातना दिल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. कैलास प्रल्हाद पाटील असं अटक केलेल्या नराधम आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहिगाव येथे एक मजूर दाम्पत्य आपला मुलगा आणि मुलीसह एका भाड्याच्या घरात राहत आहे. हे कुटुंब ज्या घरात भाड्याने राहते, त्याच घरमालकाचा मुलगा कैलास याने पीडित मुलीवर अत्याचार केला आहे. नराधम आरोपीनं काल सायंकाळी चार ते साडे चारच्या सुमारास पीडित मुलीला गोड बोलून दहा रुपये देण्याचं आमिष दाखवलं. तसेच तिला घरात घेऊन गेला. हेही वाचा-पोलीस ठाण्यातही महिला असुरक्षित; पगार देण्याच्या बहाण्यानं बोलवलं अन्..., याठिकाणी कोणी पाहात नसल्याची चाचपणी केल्यानंतर त्याने संधी साधत चिमुकलीवर अत्याचार केला आहे. यानंतर आरोपीनं पीडितेला घरातून जायला सांगितलं. पीडित मुलीची आई घरी आली असता, तिने सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. रागाच्या भरात पीडितेच्या आईनं आरोपीच्या कानशिलात लगावली. यानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी आज यावल पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-धक्कादायक! इगतपुरी-कसारा स्थानकांदरम्यान धावत्या रेल्वेत तरुणीवर अत्याचार यावल पोलिसांनी घटनेची गांभीर्यानं दखल घेत, पळून जाण्याच्या बेतात असलेल्या आरोपीला दहिगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Jalgaon, Rape on minor

    पुढील बातम्या