सोलापूर हादरलं! हॉटेल मॅनेजरचा वस्तादकडून खून; डोक्यात घातला भला मोठा दगड

सोलापूर हादरलं! हॉटेल मॅनेजरचा वस्तादकडून खून; डोक्यात घातला भला मोठा दगड

लॉकडाऊनच्या काळात हत्याकांडानं सोलापूर शहर हादरलं आहे. एका हॉटेलच्या मॅनेजरचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे.

  • Share this:

सोलापूर, 12 जुलै: लॉकडाऊनच्या काळात हत्याकांडानं सोलापूर शहर हादरलं आहे. एका हॉटेलच्या मॅनेजरचा खून झाल्याची घटना उघड झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास भला मोठा दगड डोक्यात घालून हॉटेल मॅनेजरची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

कैलास परबळकर असं मृत मॅनेजरचं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कैलास मॅनेजर म्हणून कार्यरत होता. हॉटेलचा वस्ताद आकाश मंडल याच्यावर हत्येचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारण तो घटनेनंतर फरार झाला आहे.

हेही वाचा...'पुनश्च: हरिओम'च्या नावाखाली दारूची दुकानं सुरू पण 'हरि' लॉक, भाजप नेते इंदोरीकरांच्या भेटीला

मिळालेली माहिती अशी की, हिप्परगा गावाजवळील सौरभ हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. संशयित आरोपी आकाश मंडल हा हॉटेलचा वस्ताद होता. तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी आहे. मात्र, गेल्या आठ ते दहा वर्षांपासून तो हॉटेलवर कार्यरत होता. शनिवारी रात्री मॅनेजर कैलास परबळकर आणि वस्ताद आकाश मंडल हे दोघे हॉटेलवर मुक्कामी होते. रात्रीच्या सुमारास झोपेत असतानाच संशयित आरोपी असलेल्या वस्ताद आकाश मंडलने मॅनेजरच्या डोक्यात भला मोठा दगड घालून आणि चेहरा ठेचून त्याची निर्घृण हत्या केली, असा संशय हॉटेल मालकाने व्यक्त केला आहे. तसेच हॉटेलमधील तीस-पस्तीस हजाराची रोकड, आधार कार्ड व इतर कागदपत्रेही घेऊन संशयित आरोपी आकाश मंडल पसार झाला आहे.

हेही वाचा...विकास दुबेच्या 2 साथीदारांना मुंबईत अटक, धक्कादायक माहिती समोर

दरम्यान, सोलापूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. मात्र, संशयित आरोपी आकाश मंडल याचा शोध घेणे सोलापूर ग्रामीण पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: July 12, 2020, 4:28 PM IST

ताज्या बातम्या