पिंपरी चिंचवडमध्ये वाहतोय 'गरम पाण्याचा' झरा

पिंपरी चिंचवडमध्ये वाहतोय 'गरम पाण्याचा' झरा

मात्र धक्कादायक बाब म्हणजे या झऱ्यातील पाणी एवढं गरम आहे की, त्यामध्ये टाकलेल्या प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तु जागेवरच वितळत आहेत.

  • Share this:

भोसरी, 13 डिसेंबर: पिंपरी चिंचवड परिसरातील भोसरीमध्ये असलेल्या उद्यानात गरम पाण्याचा एक झरा अचानकपने वाहु लागला आहे. त्यामुळे स्थानिकांची झरा पाहण्यासाठी स्थानिकांची गर्दी होते आहे.

या झऱ्याबद्दल नागरिकांमधुन आश्चर्य व्यक्त केल जातंय. याआधी या परिसरात कधीच गरम पाण्याचा झरा सापडला नव्हता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या झऱ्यातील पाणी एवढं गरम आहे की, त्यामध्ये टाकलेल्या प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तु जागेवरच वितळत आहेत. त्यामुळे या पाण्यापासून धोका असल्याची शंकाही नागरिकांमध्ये व्यक्त केली जाते आहे. याबाबत लोकांकडून भीतीही व्यक्त केली जाते आहे. भोसरी सहल केंद्रातील हा प्रकार असून हा प्रकार बघण्यासाठी नागरीकही गर्दी करू लागले आहेत.

काही वर्षांपूर्वी सोमनाथ इथे समुद्रात गोडं पाणी आढळलं होतं. तसंच हिमालयात अनेक गरम पाण्याचे झरे आढळतात. पण पुण्यासारख्या ठिकाणी असे झरे का मिळत आहेत याचं कारणं अजून कळू शकलेलं नाही.

First published: December 13, 2017, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading