Home /News /maharashtra /

आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात हॉस्पिटल्सला दणका, कोरोनाबाधित रुग्णांचे 17 लाख परत करण्याचे आदेश

आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात हॉस्पिटल्सला दणका, कोरोनाबाधित रुग्णांचे 17 लाख परत करण्याचे आदेश

शासन नियमापेक्षा रुग्णांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम रुग्णांना येत्या सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश

जालना, 25 मे : कोरोना (Corona) महामारीच्या काळात कोरोनाबाधितांना योग्य उपचार देऊन शासन निर्णयानुसार देयक आकारण्याचे शासनाने बंधनकारक केलेले असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या जालना (Jalana) जिल्ह्यात हा नियम पायदळी तुडवण्यात आल्याचं समोर आलं. कोविड रुग्णांकडून शासन नियमापेक्षा अधिक पैसे उकळणाऱ्या 12  खासगी कोविड हॉस्पिटल्सना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी चांगलाच दणका दिला आहे. शहरातील निरामय हॉस्पिटल, जालना क्रिटीकल केअर, सांगळे हॉस्पिटल, ओजस हॉस्पिटल, विवेकानंद इन्स्टीट्युट ऑफ मेडिकल सायन्स, संतकृपा हॉस्पिटल, अंबेकर हॉस्पिटल, जालना हॉस्पिटल, सेवाभारती कोविड हॉस्पिटल, व्यंकटेश्वर हॉस्पिटल, शिंदे बालरुग्णालय, जालना तर अंबड येथील सह्याद्री हॉस्पिटल या 12 खासगी दवाखान्यांच्या प्रशासनासोबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. NCPचे ज्येष्ठ नेते गफ्फार मलिक काळाच्या पडद्याआड, हृदयविकाराच्या झटक्यानं निधन यावेळी बोलताना जिल्हाधिकारी बिनवडे म्हणाले की, 'कोरोना या महामारीच्या काळात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये ही रुग्णांची अहोरात्र सेवा करत आहेत. परंतु, खासगी रुग्णालयांनी कोविड बाधितांवर उपचार करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच देयक आकारण्याचे बंधनकारक केले आहे. जालना जिल्ह्यातील प्रत्येक खासगी रुग्णालयांमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत देयके तपासण्यासाठी परीक्षकांची नियुक्ती केली असून त्यामध्ये जिल्ह्यातील 12 दवाखान्यांनी शासन नियमापेक्षा 291 रुग्णांकडून एकूण 17 लाख 52 हजार 327 रुपये अधिकचे घेण्यात आले आहेत.' कोरोनाची तिसरी लाट खरंच लहान मुलांसाठी घातक?आरोग्य मंत्रालयाच्या उत्तरानं दिलासा शासन नियमापेक्षा रुग्णांकडून वसूल करण्यात आलेली रक्कम रुग्णांना येत्या सात दिवसांमध्ये परत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बिनवडे यांनी यावेळी दिले.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Corona, Covid-19

पुढील बातम्या