कोरोना उपचाराचा जुलिया पॅटर्न : इथं साध्या गोळ्यांनी बहुतांश रुग्ण तंदुरुस्त होऊन जातात घरी

कोरोना उपचाराचा जुलिया पॅटर्न : इथं साध्या गोळ्यांनी बहुतांश रुग्ण तंदुरुस्त होऊन जातात घरी

जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवललेल्या पद्धतीनुसार उपचार करून अगदी स्वस्तात रुग्ण अगदी तंदुरुस्त होतो असं डॉ. रवी आरोळे यांचं म्हणणं आहे.

  • Share this:

जामखेड, 23 एप्रिल : कोरोना हा शब्द ऐकला की आता त्याबरोबर अनेक शब्द आपल्या डोळ्यासमोर फिरायला लागतात. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर. आता यातही रेमडेसिविर (Remdesivir) हे तर जणू कोरोना रुग्णांसाठी अमृतच बनलंय. कारण याची प्रचंड मागणी असून पुरवठा मात्र नाही. मात्र आपल्याच महाराष्ट्रात एक असं कोविड सेंटर आहे जिथं रेमडेसिविर किंवा महागडी औषधं न देताही रुग्णांना अगदी तंदुरुस्त करून घरी पाठवलं जात आहे. तेही अगदी मोफत. (Free treatment on cororna) हाच आहे कोरोनावर उपचार करण्याचा जुलिया पॅटर्न. (Julia hospital jamkhed)

(वाचा-मोठा दिलासा! आता कोरोनावरील उपचारही होणार कॅशलेस, विमा कंपन्यांना दिले आदेश)

तर हा जुलिया पॅटर्न आहे अहमदनगर जिल्ह्यात्या जामखेड तालुक्यातल्या ग्रामीण आरोग्य प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या जुलिया हॉस्पिटलमधील उपचारांचा. डॉ. रवी आरोळे आणि शोभा आरोळे हे बहीण-भाऊ हे हॉस्पिटल चालवतात. मॅगसेसे पुरस्कारप्रास्त दिवंगत डॉक्टर रजनीकांत आरोळे यांचे ते मुलं आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या हॉस्पिटलला कोविड हॉस्पिटल बनवण्यात आलं. याठिकाणी कोरोना रुग्णांवर ते उपचार करत आहेत आणि तेही अगदी मोफत. याठिकाणच्या उपचारांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रेमडेसिविर किंवा अशा कोणत्याही महागड्या औषधांचा मारा इथं रुग्णांवर केला जात नाही.

(वाचा-कुंभमेळ्यातून परतल्यानंतर झाला होता कोरोना; श्रवण राठोड यांच्या मुलाचा खुलासा)

खासगी रुग्णालये सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता त्यांची लूट करतात. त्यामुळं लोकांसमोर आर्थिक संकट उभं राहिलं आहे. लोक शेती विकून दवाखान्यांचा भरणा करत आहेत, असं रवी म्हणतात. कोरोनाची स्थिती समजावताना ते म्हणतात की, कोरोनाचे केवळ 20टक्के रुग्ण हे गंभीर असतात आणि त्यापैकीही फक्त 5 टक्के रुग्णांना रेमडेसिविरची गरज असते. पण तरीही त्यासाठी एवढी ओरड सुरू असल्यानं त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं सुचवललेल्या पद्धतीनुसार उपचार करून अगदी स्वस्तात रुग्ण अगदी तंदुरुस्त होतो असं डॉ. रवी आरोळे यांचं म्हणणं आहे. लोकमतनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

आरोळे यांनी या रुग्णालयात कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास 3700 रुग्णांना कोरोनामुक्त केलं. तर यावेळी आतापर्यंत 1250 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याठिकाणी सध्या 650 रुग्ण आहेत. याठिकाणी रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. पण आता या रुग्णालयासमोरही आर्थिक संकट उभं राहिलं आहे. रुग्णांना दिलं जाणारं जेवण, ऑक्सिजन यासाठीचा खर्च होतो. रुग्णांकडून आम्ही पैसे मागत नाही. पण त्यांनी स्वतःच्या मर्जीने पुढील रुग्णांच्या उपचारासाठी मदत करणं गरजेचं असल्याचं डॉक्टर आरोळे यांनी म्हटलं आहे.

Published by: News18 Desk
First published: April 23, 2021, 6:45 PM IST

ताज्या बातम्या