मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /माथेरानला हनिमून, बायकोसोबत घोडेस्वारी; अन् नवा संसार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू

माथेरानला हनिमून, बायकोसोबत घोडेस्वारी; अन् नवा संसार सुरू करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू

फाईल फोटो

फाईल फोटो

अनेक जण लग्नानंतर याठिकाणी हनिमूनसाठी येत असतात. 28 जानेवारीला असेच एक कपल मुंबईहून माथेरानला हनिमूनसाठी गेले.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Matheran, India

प्रमोद पाटील, प्रतिनिधी

रायगड, 31 जानेवारी : अनेक जण लग्नानंतर हनिमूनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात. वेगवेगळ्या पर्यटनस्थळी जातात. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान हे प्रती महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. या ठिकाणीही फिरण्यासाठी पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. खास करून हे ठिकाण नवविवाहितांसाठी फेमस हनीमुन स्पॉट आहे.

अनेक जण लग्नानंतर याठिकाणी हनिमूनसाठी येत असतात. 28 जानेवारीला असेच एक कपल मुंबईहून माथेरानला हनिमूनसाठी गेले. मोहम्मद शेख, त्यांची पत्नी आणि त्यांच्यासोबत आणखी एक जोडपे होते. माथेरान म्हटले की, घोडेस्वारी ही आलीच. मात्र, यावेळी एक धक्कादायक घटना घडली. मोहम्मद शेख हे घोडेस्वारी करत असताना अचानक घोड्याने जोरात धूम ठोकली.

यावेळी मोहम्मद शेख यांना काही समजण्याआधी ते घोड्यावरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. सोबत असलेल्या पत्नी आणि इतर मित्रांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र, दुखापत गंभीर असल्याने दुसरीकडे हलविण्यात आले. मात्र, उपचार होण्याआधीच मोहम्मद शेख यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता. मोहम्मद शेख यांच्या मृत्यूमुळे घोडेस्वार व्यवसाय करणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते की नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

हेही वाचा - पालघर : चारित्र्याचा संशय पत्नीसोबत पतीचं धक्कादायक कृत्य, चिमुकल्यांनी फोडला टाहो

याबाबत नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे असेल. मात्र, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मागे घोड्यावर बसुन घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांना हेल्मेट घातले जात होते. पुन्हा असाच प्रयोग केला जातो का? याबाबत स्थानिक प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Couple, Death