रायचंद शिंदे (प्रतिनिधी)
शिरुर, 5 मे- शिरुरच्या पश्चिम भागात बिबट्याची दहशत कायम असून तालुक्यातील कवठे येमाई येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्याच घोडा ठार झाला आहे. गणेशनगरमध्ये रविवारी पहाटे ही घटना घडली.
गणेशनगरमध्ये मेंढपाळ नाथा कऱ्हे यांच्या मालकीच्या घोड्याचे बिबट्याने लचके तोडले. या हल्ल्यात त्यांचा घोडा ठार झाला असून नाथा कऱ्हे यांचे 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मागील दोन महिन्यांत या परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव कुत्री, बकरे, गाय फस्त केल्या आहेत. आजच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने तातडीने येथे पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. या ठिकाणी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन वनविभागाचे हनुमंत कारकूड यांनी दिले आहे.
शेतात बिबट्याच्या पायांचे ठसे..
बिबट्याच्या पायांचे ठसेही आढळून आल्याने व नागरीवस्तीत भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभाग येथे पिंजरा लावणार असून पीडित मेंढपाळास योग्य ती शासकीय मदत देण्याचे आश्वासन वनविभागाने दिले आहे.
VIDEO: पार्किंगच्या कारणावरून महिलांची तुंबळ हाणामारी