मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ट्रक-मोटरसायकलचा भीषण अपघात; चाकाखाली चिरडून महिला जागीच ठार

ट्रक-मोटरसायकलचा भीषण अपघात; चाकाखाली चिरडून महिला जागीच ठार

हा अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या देह छिन्न विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता.

हा अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या देह छिन्न विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता.

हा अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या देह छिन्न विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता.

  • Published by:  Meenal Gangurde
वाशिम, 16 डिसेंबर/किशोर गोमाशे :  वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तहसील नजीक एक भयंकर अपघात घडल्याचे वृत्त समोर आले आहे. ट्रक आणि मोटरसायकलच्या अपघातात मोटरसायकलवरील महिला ट्रकच्या मागील चाकात अडकल्याने चिरडून जागीच ठार झाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की महिलेच्या देह छिन्न विच्छिन्न अवस्थेत रस्त्यावर पडून होता. क्रश सँडने भरलेला ट्रकची (क्रमांक एम एच 04 - सी जी 4267) अकोला - नांदेड महामार्गावरुन रस्ते कामासाठी जात असताना मोटारसायकल क्र एम एच 30 बी 4613 ला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात मोटारसायकल वरून जाणारे महादेव तुकाराम खुळे ( वय 55वर्षे ) कमला महादेव खुळे ( वय 50 वर्षे ) रा कोथळी ता. बार्शी टाकळी जि अकोला आणि त्यांचा 5 वर्षीय नातू जमिनीवर कोसळले. यामध्ये कमला महादेव खुळे ही महिला ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाली. तर तिचा पती आणि नातू हे किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यानंतर ट्रकच्या चालकास मालेगांव पोलिसांनी ताब्यात घेतले असून जखमींवर रुग्णांलयात उपचार सुरू आहेत. महामार्गाच्या कामासाठी ट्रक आणि माल वाहतूक करणारी वाहने भरधाव जात असल्यानं अपघाताच्या संख्येत वाढ झाली असून या वाहनांना चाप बसविण्याची गरज स्थानिकांनी व्यक्त आहे.
First published:

Tags: Road accident

पुढील बातम्या