पुण्यात भरधाव कारने संपूर्ण परिवाराला चिरडलं; अपघातात चिमुरडीचा मृत्यू

पुण्यात भरधाव कारने संपूर्ण परिवाराला चिरडलं; अपघातात चिमुरडीचा मृत्यू

  • Share this:

17 एप्रिल : बाणेर गावात भरधाव वेगात जाणाऱ्या एका कारने रस्त्याच्या दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना उडवल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. अपघातानंतर कार खांबाला जाऊन धडकली. यामध्ये एका तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाला असून एका मुलीसह चौघे जखमी आहेत.

याप्रकरणी कार चालविणाऱ्या महिलेच्या विरोधात चतुःश्रुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं असून त्यावरून अपघाताच्या भीषणतेची स्पष्टपणे कल्पना येते.

ईशा विश्वकर्मा असं या अपघातात ठार झालेल्या चिमुरडीचं नाव आहे. इतर चार जण गंभीर जखमी  असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी कारचालक सुजाता श्रॉफ हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख आणि विश्वकर्मा कुटुंबिय एकमेकांचे शेजारी आहेत.  डी मार्टमधून खरेदी करून घरी जात असताना हा अपघात घडला. बाणेर रोडवरील दुभाजकावर हे सर्वजण उभे होते. त्याचवेळी भरधाव वेगात आलेली एक कार थेट दुभाजकावर चढली आणि त्याखाली हे सर्वजण चिरडले गेले.

या अपघातात एका चिमुरडीचा मृत्यू झाला. तर बाकीचे चौघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचालक महिला ही एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 09:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading