• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • बुलडाण्यातील भयावह दृष्य, कोरोना काळात संग्रामपूरमध्ये 40 बाळांचा मृत्यू

बुलडाण्यातील भयावह दृष्य, कोरोना काळात संग्रामपूरमध्ये 40 बाळांचा मृत्यू

अत्यावश्यक उपचारासाठी अकोला 80 किमी अंतरावर आहे, खामगाव 60 किमी तर शेगाव 45 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे.

अत्यावश्यक उपचारासाठी अकोला 80 किमी अंतरावर आहे, खामगाव 60 किमी तर शेगाव 45 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे.

अत्यावश्यक उपचारासाठी अकोला 80 किमी अंतरावर आहे, खामगाव 60 किमी तर शेगाव 45 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे.

 • Share this:
  राहुल खंदारे, प्रतिनिधी बुलडाणा, 24 सप्टेंबर : कोरोनाच्या (corona) काळात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले. घरातील अनेक कर्ते पुरुष कोरोनाचे बळी ठरले. कोरोनाच्या काळात एकीकडे अनाथ मुलांची संख्या मन सुन्न करणारी आहे. तर त्याहुन विदारक म्हणजे, बुलडाण्यात (buldhana) कोरोना काळात 1602 बालकांचा जन्म तर 40 बालकांचा मृत्यू झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील  संग्रामपूर (Sangrampur ) तालुक्यामध्ये माहे ऑगस्ट मध्ये एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं. यामध्ये कोवळी पानगळ झाल्याने धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. वर्षभरात संग्रामपूर तालुक्यामध्ये 1602 बालकांचा जन्म झाला आहे. त्यामध्ये 40 बालकांचा मृत्यू झाला. यामध्ये 23 बालके अर्भक तर उपजत बालक 17 एवढी आहे. याची टक्केवारी सरासरी 12 एवढी भीषण असल्यास येथील स्थिती गंभीर आहे, असे स्पष्ट दिसून आले. IPL 2021 : व्यंकटेश अय्यरने सौरभ गांगुलीमुळे बदलली स्टाइल; सांगितलं खास कारण अर्भक व बालमृत्यूमध्ये वाढ दिसून आली आहे. शासन  आदेशाने ग्राम बाल विकास केंद्राबाबत अहवाल तयार करण्यात आला आहे.  0 ते 5 वयोगटातील ११३९२  बालकांचे वजन केले असता, सॅम मॅम गटात २०८  तीव्र व मध्यम बालके आढळून आली आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, त्यामध्ये दोन गर्भवती मातेचा मुत्यू झाला आहे. संग्रामपूर तालुका हा दुर्लब आहे. सातपुडाचा दुर्लक्षित आदिवासी तालुका आहे. तालुक्यामध्ये  4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्याचे उपकेंद्र वरुड बकाल हे ग्रामीण रुग्णालय आहे. जिल्हा परिषद आरोग्य सेवा प्राथमिक उपचारांपूर्ती तालुक्यात आहे. अत्यावश्यक उपचारासाठी अकोला 80 किमी अंतरावर आहे, खामगाव 60 किमी तर शेगाव 45 किमी अंतरावर उपचारासाठी जावे लागत आहे. अखेर आरोग्य विभागाची परीक्षा रद्द, हॉल तिकीटाच्या गोंधळामुळे निर्णय तर प्राथमिक आरोग्य केंद्रात एमबीबीएस ,बाल रोग, स्त्री रोग तज्ञ सुद्धा नाही. आदिवासी भागाची भीषण स्थिती आहे. मानव विकास मिशनमधून खाजगी स्त्रीरोग व बालरोग तज्ञांना महिन्यातून दोनदा प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रावर मानधन तत्त्वावर बोलण्याची तरतूद आहे. आरोग्य विभाग गंभीर नसल्याचा आरोप होतो,  संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोविंड लसीकरणासाठी जुंपण्यात आली असल्याने त्यासाठी अभियानाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरोना काळात वर्षभरात तालुक्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
  Published by:sachin Salve
  First published: