मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

HONOR 9Xचा रिव्ह्यू – कसा आहे सर्वात कमी किमतीचा चांगला पॉप-अप फोन?

HONOR 9Xचा रिव्ह्यू – कसा आहे सर्वात कमी किमतीचा चांगला पॉप-अप फोन?

HONOR 9X मध्ये 16MP चा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा अगदी सहज, तंतोतंत फोटो काढतो. याचा फेस डिटेक्शन जलद काम करतो.

HONOR 9X मध्ये 16MP चा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा अगदी सहज, तंतोतंत फोटो काढतो. याचा फेस डिटेक्शन जलद काम करतो.

HONOR 9X मध्ये 16MP चा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा अगदी सहज, तंतोतंत फोटो काढतो. याचा फेस डिटेक्शन जलद काम करतो.

  • Published by:  Manoj Khandekar

HONOR ने स्मार्टफोन टेक्नोलॉजीला पुन्हा एकदा अव्वल बनवलंय. २०२०ची सुरुवात मोठी शानदार करत कंपनीनं आपल्या लोकप्रिय एक्स सीरिजमध्ये नवा स्मार्टफोन HONOR 9X आता लॉन्च केलाय. या फोनमधला महत्त्वाचा भाग म्हणजे याचा ट्रिपल कॅमेरा. यात 48MP मेन कॅमेरा दिलाय. कॅमेऱ्यासोबत या फोनचं डिझाइन खूप आकर्षक आहे. फोनच्या बॅक पॅनलमध्ये तुम्हाला X आकार दिसेल. तो या फोनचा रंग आणि स्टाइलबरोबर एकदम छान दिसतो. हा फोन हातात घेतल्यावर तुमच्या स्टेट्स सिंबलमध्ये नक्कीच वाढ होईल.

या फोनचे खास फीचर्स आणि स्पेक्स तुम्हाला फोनच्या डिझाइनसारखे आकर्षक आणि शानदार वाटतील. आम्हाला हा फोन वापरायची संधी मिळाली, म्हणूनच या फोनमधली वैशिष्ट्य तुमच्याशी शेअर करायला आम्ही उत्सुक आहोत.

डायनॅमिक डिझाइन आणि डिस्प्ले – HONOR 9X हा पूर्ण डिस्प्ले आणि कर्व्हड डिझाइन असलेला सुंदर स्मार्टफोन आहे. यात बॅक पॅनल ग्लॉसी फिनिशचं असतं. त्यामुळे फोनचं लूक एकदम प्रीमियम होतं. या फोनच्या बॅक पॅनलमध्ये तुम्हाला X आकाराचं डिझाइन दिसेल, ते वेगळं आणि आकर्षक आहे.

HONOR 9X मध्ये 1080x2340 पिक्सल रिझाॅल्युशनबरोबर 6.59 इंचाचा पूर्ण एचडी डिस्प्ले दिलाय. हा एक फुलव्‍ह्यू डिस्‍प्‍ले आहे. हा कर्व्हड डिझाइनबरोबर येतो. याचा अर्थ कुठल्याही अडथळ्याशिवाय तुम्ही या फोनमध्ये गेम खेळण्याचा आणि व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेऊ शकता. आता तुम्ही विचार करत असाल की या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा आहे की नाही? नक्कीच आहे. पण तो पॉप-अप सेल्फी कॅमेरा टेक्नोलॉजीसोबत तुम्हाला मिळेल. यामुळे तुम्ही आणि डिस्प्लेच्या मध्ये तिसरा कोणी येऊ शकणार नाही. HONOR 9X मध्ये AI व्हिडिओ एन्हांसमेंट आहे. यामुळे ब्राइट आणि डार्क भागात काँट्रासला अॅडजेस्ट करतो. त्याने फोनची कामगिरी उत्तम होते. यात डोळ्याच्या सुरक्षिततेसाठी आय कंफर्ट मोड आहे. त्याला TUV Rheinland चे प्रमाणपत्र आहे. डोळ्यांवर ताण पडू नये म्हणून फोनच्या निळ्या प्रकाशाला ते फिल्टर करतं.

प्रोसेसर आणि सॉफ्टवेअर - HONOR 9X मध्ये किरिन 710 एफ ऑक्टा कोर प्रोसेसर वापरलाय. तो मिड-सेगमेंट चिपसेट आहे. हा तुम्हाला स्पीड आणि मल्टिटास्किंगचा शानदार अनुभव देतो. 4GB RAM आणि 128 GB इंटरनल मेमरीच्या या स्मार्टफोननं तुम्ही नेहमीची कामं सहज करू शकाल. फोनमध्ये GPU Turbo 3.0 सपोर्टची सुविधा आहे. या किमतीतल्या फोनमध्ये अशी सुविधा क्वचित मिळते. यामुळे तुम्ही ग्राफिक्सच्या गेमचा आनंद जास्त चांगला घेऊ शकाल. याची 6GB रॅमबरोबर 128GB ची इंटरनल मेमरी तुमच्या फोनचा स्पीड कमी करणार नाही. शिवाय त्यात सहजताही असेल. HONOR 9X EMUI 9.1.0 वर चालतो. पण कंपनीचं म्हणणं आहे की, या डिव्हाइसला Android 10 मध्ये अपग्रेड केलं जाईल. या फोनला 4,000mAh ची बॅटरी आहे. यामुळे वेगानं चार्जिंग होतं आणि अख्खा दिवस ती चालते.

कॅमेरा युझर्सना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी फोनचा कॅमेरा मोठी कामगिरी बजावत असतो. HONOR 9X मध्येही याकडे लक्ष दिलंय. फोनमध्ये ट्रिपल रियल कॅमरा सेटअप आहे. ज्यात 48MPचा प्रायमरी कॅमेरा आहे. हा कॅमेरा या फोनची मोठी खासीयत आहे. याच्या मदतीनं तुम्ही चांगला फोटो काढू शकता. तुम्ही एक्स्ट्रिम झूम करूनही शानदार फोटो काढू शकता. HONOR 9Xचा 8MP वाला सुपर वाइड अँगल कॅमेरा 120 डिग्री फील्ड ऑफ व्ह्यूबरोबर तुमच्या ग्रुप फोटोला अप्रतिम करेल. याच्या 2MP डेप्‍थ सेंसर बोकेह इफेक्टमुळे चांगला पोर्ट्रेट शॉट मिळतो. HONOR 9X मध्ये 16MPचा AI पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे. हा कॅमेरा एकदम अचूक आणि आकर्षक फोटो काढू शकतो. याचा फेस डिटेक्शन जलद काम करतो. HONOR चा हा फोन अँटी डस्ट आणि स्प्लॅश मेकॅनिझमवर आधारित आहे. हा फोन तुम्हाला उत्तम फोटोग्राफीचा अनुभव देईन यावर आमचा विश्वास आहे. याची फोटोग्राफी आम्हाला आवडलीय.

किंमत HONOR 9X तुमच्या खिशावर किती परिणाम करतो ते पाहू. पण त्याची काळजी नको. कारण इतके भारी फीचर्स आणि डिझाइन असूनही कंपनीनं हा स्मार्टफोन माफक दरात आणलाय. या फोनमध्ये 2 वॅरिएंट आहे. 4GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज वॅरिएंटची किंमत 13,999 रुपये आहे. पण येणाऱ्या सेलच्या पहिल्या दिवशी हा फोन खरेदी केला तर 1000 रुपयांच्या डिस्काउंटसोबत 12,999 रुपयांपर्यंत हा फोन मिळेल. याशिवाय 19 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत असणाऱ्या या ऑफरमध्ये तुम्ही ICICI Bank क्रेडिट कार्ड आणि Kotak Bank डेबिट तसंच क्रेडिट कार्ड यांनी खरेदी केली तर 10% डिस्काउंट मिळेल. ऑफरमध्ये खरेदी केल्यावर 2,200 रुपयांचा तुम्हाला JIO रिचार्ज वाउचर मिळेल. त्यात तुम्ही रोज 50 रुपये प्रति रिचार्जप्रमाणे 44 रिचार्जपर्यंत वापरू शकता.

निष्कर्ष – हा फोन वापरल्यानंतर आम्ही हे म्हणू शकतो की फोटोग्राफीची आवड असणाऱ्यांसाठी फोनचा अनुभव लाजवाब असेल. शिवाय या किमतीत मिळणारा असा हा दमदार फोन असेल. या फोनचं डिझाइन आणि लूक आम्हाला आवडलाय.. फोन वजनदार नसल्यानं तो वापरणंही सोपं आहे.

तेव्हा आता अजिबात उशीर न करता, तुम्ही खरेदी करा HONOR 9X.

First published: