मधमाश्यांच्या हल्यात मामा दगावला भाचा बचावला

मधमाश्यांच्या हल्यात मामा दगावला भाचा बचावला

मधमाशांचा चावा हा अतिशय धोकादायक असतो. त्यांच विष काही क्षणात पूर्ण शरीरात पसरतं.

  • Share this:

राजेश भागवत, पाचोरा 1 नोव्हेंबर : पाचोरा तालुक्यातील लोहारा इथं मधमाशांनी मामा-भाच्यांवर हल्ला केलाय. या हल्ल्यात मामाचा मृत्यू झाला तर त्यांचा भाचा थोडक्यात बचावला. अचानक झालेल्या या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. पोचोरा इथले रहिवासी काशिनाथ यशवंत राजपूत ( वय 60) व त्यांचा भाचा गोपाल रघुनाथ राजपूत ( वय 25 ) हे शेतात पाहणी करण्यासाठी जात होते. जात असतांना सकाळी 11 वाजताच्या दरम्यान मधमाश्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी भाचा गोपाल हा एका आडोशाला लपला. मामा काशिनाथ यांच्यावर मधमाश्यांनी हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले.

शिवसेना खासदाराला घेरण्यासाठी शिवसैनिकच एकवटले, अडचणी वाढणार?

लाखो माशा त्यांच्यावर तुटून पडल्याने त्याच्या सर्व अंगभर माशांनी चावा घेतला. काही क्षणात त्यांचं अंग लाल झालं आणि प्रचंड आग होऊ लागली. त्यांना अधिक उपचारासाठी पाचोरा येथील रुग्णालयात आणत असतांनाच रस्त्यातच त्यांचा मुत्यु झाला. पाचोरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीनंतर त्यांचा मृत्यु झाला असल्याचं सांगितलं.

मधमाशांचा चावा हा अतिशय धोकादायक असतो. त्यांच विष काही क्षणात पूर्ण शरीरात पसरतं. अचानक लाखो माश्या जेव्हां अंगावर येतात तेव्हा बचावाची संधीही मिळत नाही. माशांची आधीच चाहुल लागली तर काही उपाय करतात येतात मात्र अचानक हल्ला केल्यास तो जास्त धोकादायक ठरू शकतो.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर शरद पवार, पिकांची केली पाहणी

शरीरात गेलेलं विष रक्ताद्वारे सगळीकडे पसरत असल्याने त्यावर औषधोपचारही फारसे उपयोगी पडत नाहीत. मधमाशांच्या प्रकारावरही त्याची तीव्रता अवलंबून असते. मात्र शेतात जाण्याआधी किंवा मधमाश्यांचं पोळं काढण्याआधी त्याचं योग्य प्रशिक्षण घेतल्यास मधमाशांपासून होणार धोका टाळला जाऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 1, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading