Home /News /maharashtra /

अभ्यास अपूर्ण राहिला म्हणून शाळकरी मुलांनी रचला अपहरणाचा बनाव, पण...

अभ्यास अपूर्ण राहिला म्हणून शाळकरी मुलांनी रचला अपहरणाचा बनाव, पण...

अभ्यास अपूर्ण असल्याने पालक रागवतील या भीतीतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अपहरणाच केलेला बनाव उघडकीस आला...

अभ्यास अपूर्ण असल्याने पालक रागवतील या भीतीतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अपहरणाच केलेला बनाव उघडकीस आला...

अभ्यास अपूर्ण असल्याने पालक रागवतील या भीतीतून दोन विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अपहरणाच केलेला बनाव उघडकीस आला... 

सांगली, 23 नोव्हेंबर : अभ्यास (homework) अपुरा असल्याने शिक्षक (teacher) पालकांना बोलवून घेतील आणि आपल्याला रागवला जाईल. या भीतीपोटी दोन शालेय विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अपहरणाचा (kidnapping ) बनाव केल्याचा धक्कादायक  प्रकार सांगलीमध्ये (sangali) उघडकीस आला आहे.  या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अपहरणाचा बनाव उघडकीस आणला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पलूस तालुक्यातील बुर्ली गावातील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी शाळेत जात असताना दोन मोटर सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी अपहरण केल्याचं सांगितलं. या अनोळखी इसमांनी जबरदस्तीने मोटर सायकलवर बसवून दमदाटी करुन बुर्ली गावातून अपहरण केलं आणि तिथून  आमणापूर औदुंबर मार्गे भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पुलावर सोडले असं या मुलांनी आपल्या नातेवाईक व शिक्षकांसोबत पलूस पोलीस ठाणे येथे येवून तक्रार दिली होती. शाळेच्या बाथरुममागे विद्यार्थ्यांला मिळाला गुप्त रस्ता, आतमध्ये होतं आश्चर्य सदर प्रकाराची गंभीर दखल घेवून पलूस पोलीस ठाणेचे दोन पथके संशयितांना शोधण्याकरीता रवाना झाले. बुर्ली व आमणापूर गावातील सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी करता सदरची दोन मुलं एका मोटर सायकलवर बसून औदुंबरच्या दिशेने जात असताना दिसून आले. त्याप्रमाणे संशयितांचा शोध सुरू होता. पण पोलिसांना मुलांवरच संशय आला. त्यानंतर अल्पवयीन लहान मुलांना विश्वासात घेवून दोघांचीही पोलिसांनी सखोल चौकशी केली मात्र दोघांनी सुरुवातीला अगदी हुबेहुब एकमेकांसारखीच हकिकत सांगितली. पण पोलिसांनी त्यांचेकडे पुन्हा संयमाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता, दोघांनी स्वतःच्या अपहरणाचा बनाव केल्याची कबुली दिली. साताऱ्यात लवकरच भूकंप? शरद पवारांसोबत बैठकीनंतर शशिकांत शिंदेंचं मोठं विधान आपला शाळेतील अभ्यास अपुरा होता, त्यामुळे शिक्षक पालकांना सांगतील व पालक रागावतील भितीने हा सर्व प्लॅन आखला होता. त्याप्रमाणे  आमणापूर येथे चालत जावून तेथून आपली शाळा भिलवडी येथे असून एस टी बंद आहे. लिप्ट द्या, अशी विनंती करून मोटर सायकलवर बसून भिलवडी येथे उतरले आणि तेथून घरी फोनकरून नातेवाईकांना अपहरण केल्याचे सांगितलं. त्यानंतर सदर अपहरणाचा बनाव उघड झाल्याने सर्वांनीच सुटकेचा श्वास सोडला.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Kidnapping

पुढील बातम्या