Home /News /maharashtra /

Parbhani: लग्नाच्या वरातीत गाणं गाताना हृदयविकाराचा झटका, रस्त्यातच कोसळली महिला, घटनास्थळीच मृत्यू

Parbhani: लग्नाच्या वरातीत गाणं गाताना हृदयविकाराचा झटका, रस्त्यातच कोसळली महिला, घटनास्थळीच मृत्यू

PHOTO Credit: Facebook

PHOTO Credit: Facebook

संगीता गव्हाणे या परभणी येथे होमगार्डची नोकरी करत होत्या. सोबतच्या त्यांना गाण्याचीही आवड होती. यामुळे नोकरीसोबत त्या आपल्या गाण्याची आवडही जोपासत होत्या.

    परभणी, 25 मे : सध्या उन्हाळा (Summer Season) सुरू असल्याने लग्नाचा मौसम सुरू आहे. कोरोना काळात निर्बंध लादले गेल्यामुळे (Corona Restrictions) अत्यंत मोजक्या लोकात लग्न (Marriage) लावण्यात आले. तर काहींनी आपले लग्न पुढे ढकलले. कोरोना काळानंतर आता संपूर्ण स्वरुपात अनलॉक झाल्याने मोठ्या धुमधडाक्यात लग्न होत आहेत. मात्र, यातच आता एका लग्नात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नेमकं काय घडलं परभणी (Parbhani) रोडवरील एक लग्नसोहळ्याचे (Marriage) आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एक धक्कादायक घटना घडली. येथील मंगल कार्यालयात सुरू असलेल्या लग्न सोहळ्यात गाणे (Song) म्हणणाऱ्या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू (Death due to Heart Attack) झाला आहे. संगीता गव्हाणे, असे 48 वर्षांच्या मृत महिलेचे नाव आहे. ढोलताशे आणि बँडच्या तालात मिरवणूकही निघाली होती संगीता गव्हाणे या परभणी येथे होमगार्डची नोकरी करत होत्या. सोबतच्या त्यांना गाण्याचीही आवड होती. यामुळे नोकरीसोबत त्या आपल्या गाण्याची आवडही जोपासत होत्या. परभणीच्या पाथरी रोडवरील एका लग्नसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे वऱ्हाडी, नातेवाईक, आप्तेष्ट सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ढोलताशे आणि बँडच्या तालात मिरवणूकही निघाली होती. या लग्न सोहळ्यात संगीता गव्हाणे या सहभागी झाल्या होत्या. हेही वाचा - आंबे तोडणे जिवावर बेतले, विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू यावेळी त्यांना गाणे म्हणण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी गाणे म्हणायला सुरुवात केली. यानंतर गाणे गात असताना अचानक त्या खाली कोसळल्या. त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. यावेळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. कामावरुन काढल्याच्या रागातून मारहाण, चिंचवडमधील धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी (Pimpri) येथे एकाला मारहाणीची घटना घडली आहे. कामावरुन काढल्याच्या रागातून तरुणाला मारहाण केल्यानतंर भांडण सोडवायला आलेल्या कामगारांना धमकी (Threatening) देण्यात आली. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police) कारवाई करत आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किरण सोपान थिटे, असे मारहाणीत जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना चिंचवड येते 20 तारखेला दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी अक्षय गोफणे, ओमकार गावडे दोन्ही (रा. शरदनगर, चिखली) यांच्यासह एकूण 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Marriage, Parbhani news

    पुढील बातम्या