राष्ट्रवादीला दिलेल्या वेळेआधीच राष्ट्रपती राजवटीची घाई का? गृह मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर

राष्ट्रवादीला दिलेल्या वेळेआधीच राष्ट्रपती राजवटीची घाई का? गृह मंत्रालयानं दिलं 'हे' उत्तर

भाजपनंतर शिवसेनेला सत्ता स्थापनेचा दावा करता आला नाही. त्यानंतर मंगळवारी रात्री 8.30 पर्यंत राष्ट्रवादीला वेळ दिला असताना त्याआधीच राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : गेल्या 15 दिवसांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता. शेवटी कोणीच सरकार स्थापन करू न शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्याला मंजूरी मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. गृह मंत्रालयाने म्हटलं की, ही घोषणा संविधानाच्या कलम 356(1) नुसार करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू होईल. हा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालानंतर घेण्यात आला. यामध्ये कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास समर्थ नाही असं म्हटलं होतं.

गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी CNN News18 शी बोलताना सांगितलं की, राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी सर्व प्रयत्न आणि शक्यता पाहिल्या. मात्र कोणालाही यश मिळालं नाही. त्यानंतर ज्यावेळी राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसली नाही तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली. दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यावरून राज्यपालांवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला मगंळवारी रात्री साडेआठ वाजेपर्यंत वेळ असतानाही त्याआधीच राष्ट्रपती राजवटीची घाई का असा प्रश्न विचारला गेला. काँग्रेस नेते आणि वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सांगितलं की, राष्ट्रपति राजवट हा शेवटचा पर्याय असतो. ज्यावेळी एखादा पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही असं म्हणतो तेव्हा दुसरा पक्ष आम्ही तयार करू शकतो पण वेळ द्या असं म्हणतो. मात्र, तो दिला जात नाही.

रथाने राहुद्या पण टांग्याने तरी ठरवलेल्या मार्गाने जावं; राऊतांनी रुग्णालयात लिहिला अग्रलेख

राज्यपालांच्या या निर्णयावर गृह मंत्रालयाने म्हटलं की, राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस तेव्हा केली जेव्हा मंगळवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकार स्थापनेसाठी तीन दिवसांची आणखी वेळ मागितली. राज्यपालांचे पत्र मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रपती राजवटीची शिफारस करण्यात आली.

सेनेचा नेमका गेम कुणी केला? पडद्यामागे नेमकं काय घडतंय? पाहा SPECIAL REPORT

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. यावरून शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या पक्षाने बहुमत असल्याचा दावा केला तरच महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटू शकते.

VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shivsena
First Published: Nov 13, 2019 08:37 AM IST

ताज्या बातम्या