मुंबईत आणखी एक मृत्यू; दिवसभरात दुसरा बळी मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात 5 झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. हेही वाचा..देशातील कोरोना बाधित रुग्णांबाबत शरद पवार यांनी घेतला मोठा निर्णय देशभरात सर्वाधिक रुग्ण राज्यात सापडले आहेत. नागपुरात आणखी एक 42 वर्षांच्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 125 झाला आहे. वाशीत झालेल्या मृत्यूविषयी मिळालेल्या माहितीनुसार, 24 मार्चला या महिलेचा मृत्यू झाला होता. आज शवविच्छेदन अहवाल हाती आला असता हा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचं समोर आलं. मृत महिला ही उपचारासाठी वाशीमधल्या 2 खासगी रुग्णालयात गेली होती, अशीही माहिती समोर येत आहे. त्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की, पुण्यात गेल्या 60 तासांत एकाही नव्या रुग्णाची भर पडलेली नाही, अशी माहिती पुण्याच्या महापौरांनी दिली आहे. दुसरीकडे आज पुन्हा तीन अंकांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. हेही वाचा..लॉकडाऊनमधील सर्वात भयंकर बातमी, कंटेनरमध्ये कोंबून 300 मजुरांचा अमानवीय प्रवास नागपूरमध्ये सापडलेला 42 वर्षांचा नवा रुग्ण परदेशातून आलेला नाही. किंवा त्याचा कुठल्या परदेशातून आलेल्या व्यक्तीशी थेट संपर्क झाल्याचं लक्षात नाही. तो दिल्लीहून नागपूरमध्ये आलेला होता. त्यामुळे आता कम्युनिटी ट्रान्समिशनची भीती वाढली आहे. तत्पूर्वी ठाण्यात आणखी एक तर पनवेलमध्ये एक असे दोन नवे कोरोना रुग्ण आज सकाळपासून समोर आले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.I've asked for releasing nearly 11,000 convicts/undertrials imprisoned for offences with prescribed punishment upto 7 yrs or less on emergency parole / furlough to reduce overcrowding in prisons and contain the risk of a #COVID19 outbreak.#WarOnCorona
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) March 26, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, Coronavirus