Home /News /maharashtra /

चोराचा गृहमंत्र्यांच्या सचिवांना दणका, कारची काच फोडून बॅग पळवली

चोराचा गृहमंत्र्यांच्या सचिवांना दणका, कारची काच फोडून बॅग पळवली

लग्न सोहळा आटोपल्यानंतर बाबासाहेब शिंदे परतीच्या प्रवासाला निघाले होते. पण, कारची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आले.

लग्न सोहळा आटोपल्यानंतर बाबासाहेब शिंदे परतीच्या प्रवासाला निघाले होते. पण, कारची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आले.

लग्न सोहळा आटोपल्यानंतर बाबासाहेब शिंदे परतीच्या प्रवासाला निघाले होते. पण, कारची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आले.

    फलटण, 11 डिसेंबर : चोर काय चोरी करेल याचा नेम नाही. चोरांच्या घटनांना आळ घालण्यासाठी पोलीस नेहमी सतर्क असतात. पण राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांच्याच खासगी सचिवाला चोराने चांगलाच धक्का दिला आहे. खासगी सचिवाच्या गाडीतून रोख रक्कमेसह बॅगच चोरीला (Theft) गेल्याची घटना सातारा (satara) जिल्ह्यातील फलटणमध्ये समोर आली आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खासगी सचिव बाबासाहेब शिंदे (babasaheb shinde) हे सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये धुळदेव इथं 10 डिसेंबर रोजी एका लग्न सोहळ्यासाठी आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर बाबासाहेब शिंदे परतीच्या प्रवासाला निघाले होते. पण, कारची काच फोडल्याचं त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कारची पाहणी केली असता एक बॅग आणि रोख रक्कम कुणी तरी चोरी केल्याचे लक्षात आले. या बॅगेमध्ये महत्त्वाची कागदपत्र होती, असं वृत्त टाइम नाऊ मराठीने दिले आहे. MIM च्या शेकडो कार्यकर्त्यांकडून टोल घेतलाच नाही, सर्वसामान्यांसाठी वेगळा न्याय? शिंदे यांनी तातडीने फलटण शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस शोध घेत आहे. पण, गृहमंत्र्यांच्या सचिवाची बॅग चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नाशिकमध्ये प्रख्यात शिल्पकाराच्या आर्ट स्टुडिओवर दरोडा दरम्यान, नाशिकमध्ये (Nashik) प्रख्यात शिल्पकार मदन गर्गे (Madan Garge) यांच्या सातपूर नजिकच्या बेळगाव ढगा येथील आर्ट स्टुडिओवर (Art Studio) संशयितांनी दरोडा टाकला. चोरांनी वॉचमन आणि त्याच्या पत्नीस कोयत्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत साडेआठ लाख रुपयांचे महापुरुषांच्या पुतळ्याचे ब्राँझ धातूचे भाग जबरीने चोरुन (Stolen) नेले. स्टुडिओवर पाळत ठेवून तसंच किंमती ब्राँझ धातूच्या चोरीसाठीच दरोड्याचा हा धाडसी प्रकार झाल्याचा अंदाज सातपूर पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: सातारा

    पुढील बातम्या