मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''मी माझ्यानुसार काम करतोय,राजकीय कोण काय बोलतो ते...'', गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भडकले

''मी माझ्यानुसार काम करतोय,राजकीय कोण काय बोलतो ते...'', गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भडकले

सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी यावर भाष्य केलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare
मुंबई, 19 एप्रिल: राज्यातील मशिदींवरील भोंग्यांवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (Maharashtra Navnirman Sena) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. यावर आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी यावर भाष्य केलं आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आम्ही तयार आहोत. जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर कादेशीर कारवाई होणार असल्याचं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मी माझ्यानुसार काम करतोय. कायद्यानुसार, नियमानुसार काम करतोय. मी माझ्या पद्धतीने ऍक्शन घेतो, राजकीय कोण काय बोलतो ते महत्वाचे नाही, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं. कुठल्याही वक्तव्यामुळे आणि बोलण्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर कारवाई केली जाते. राज्याच्या पोलीस महासंचालक यांना सूचना दिल्या आहेत, त्या त्या शहरातील पोलीस आयुक्तांसोबत बैठक घेतली जात असल्याचं ते म्हणालेत. बैठकीनंतर त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांसोबत नेहमी बैठक होते.राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संदर्भात चर्चा होते, हे देखील गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. कांदिवलीत BJP च्या पोल खोल सभेचा स्टेज उद्धवस्त, शिवसैनिकांकडून तोडफोड आम्ही पूर्ण तयारीत आहोत, कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होणार नाही. सर्व पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जाईल. काही घटकांकडून अशांतता निर्माण होईल असे प्रयत्न होतोय, देशात आणि राज्यातही सर्वांशी चर्चा केली जात असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. अमरावतीमध्ये काही घटना घडतात याचा अर्थ त्या ठिकाणी काही असामाजिक तत्व तिथे काम करत आहेत. त्यांचा बंदोबस्त लावण्याची गरज असल्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे. सरकारी आदेशानुसार कोणी कुठे जात नसतो तो त्यांचा अधिकार असतो. आपल्या देशात वेगवेगळ्या कारणांवरून जातीत भावना भडकविण्यासंदर्भात प्रयत्न होतोय, अशांतता निर्माण केली जात आहे. इतर प्रश्नकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असंही त्यांनी म्हटलं आहे.
First published:

Tags: Raj Thackeray (Politician)

पुढील बातम्या