गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल, एकावर बलात्काराचा गुन्हा

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल, एकावर बलात्काराचा गुन्हा

धक्कादायक म्हणजे, यातील दोन जण एमआयएचे माजी नगरसेवक आहे. सर सय्यद मतीन याची एमा यांना पक्षातून हकालपट्टी केली आहे.

  • Share this:

औरंगाबाद, 02 फेब्रुवारी : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh)  पोलिसांना अनेक सूचना देत असतात. पण दुसरीकडे गृहमंत्र्यांसोबत (criminals)काही गुन्हेगारांनी फोटो काढल्याचा प्रकार समोर आला आहे. हा फोटो आता चांगलाच व्हायरल झाला आहे.

राज्याचे गृह मंत्री यांचा एक फोटो चर्चेचा ठरला आहे. या फोटोत गृहमंत्र्याचे शेजारी उभ्या असलेल्या या तिघांवर ही गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकाने 500 ट्रक चोरून त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा दाखल आहे तर दुसऱ्यावर  बलात्कार आणि अन्य गुन्हे दाखल आहेत. तडीपारीची देखील कारवाई प्रस्थावित आहे तर अन्य एकावर ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

IND vs ENG: इंग्लंडच्या बॉलरनं तयार केला भारतीय बॅट्समन्सना आऊट करण्याचा प्लॅन

यापूर्वीसुद्धा राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री  आर.आर. पाटील यांच्या समवेत एक गुन्हेगार उभा असल्याचा फोटो समोर आला होता. भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना देखील एका गुन्हेगारांसोबत फोटो पाहायला मिळाला होता. मात्र, येथे गुन्हेगारांच्या मध्येच गृहमंत्री असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोण आहेत हे गुन्हेगार?

कलीम कुरेशी - गुटखा किंग म्हणून याची ओळख आहे. पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांनी मध्यंतरी ड्रग्स प्रकरणी एक गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये देखील याची गाडी आढळून आली होती. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.

सय्यद मतीन - याच्यावर बलात्कारासह अन्य गुन्हे दाखल आहे. तसंच तडीपारीची कारवाई देखील प्रस्तावित आहे.

जफर बिल्डर-  याच्यावर 500 ट्रक चोरून सुटे भाग करून विकणाऱ्या टोळीतला हा गुन्हेगार आहे.

एमआयएमचा नगरसेवक अट्टल गुन्हेगार!

विशेष म्हणजे, यातील सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल आहे तो बराचकाळ जेलमध्ये होता. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील पोलीस हातकड्या घालून हजेरी लावत होते. धक्कादायक म्हणजे, यातील दोन जण एमआयए चे माजी नगरसेवक आहे. सर सय्यद मतीन याची एमआयएम पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Published by: sachin Salve
First published: February 2, 2021, 9:13 AM IST
Tags:

ताज्या बातम्या